राज्यातील जनतेने शांतता व संयम राखावं; गृहमंत्र्यांचं आवाहन |Dilip Walse Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dilip walse patil

राज्यातील जनतेने शांतता व संयम राखावं; गृहमंत्र्यांचं आवाहन

sakal_logo
By
दीपा कदम

मुंबई : त्रिपुरा राज्यात (tripura state) मुस्लीम समाजावर (Muslim community) होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला (strike) राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा (law and order) प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने (Police authorities) दक्ष राहावे असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.

हेही वाचा: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ED कोठडीत तीन दिवसांची वाढ

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे. तसेच पोलीसांनी परिस्थिती संयमाने हाताळण्याचे आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्यरत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

loading image
go to top