माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ED कोठडीत तीन दिवसांची वाढ | Anil Deshmukh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

anil deshmukh

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ED कोठडीत तीन दिवसांची वाढ

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : माजी गृहमंत्री अनील देशमुख (Anil Deshmukh) यांचा ईडी कोठडीतील (enforcement directorate prison) मुक्काम आणखी तीन दिवस ( ता 15) वाढला आहे. कारागृहात चौकशीच्या सबबीखाली तपास अधिकारी माझा मानसिक छळ (Mental harassments) करीत आहेत, असा आरोप (Allegation) देशमुख यांनी न्यायालयात केला.

हेही वाचा: CYSTIC FIBROSIS : संशयित रुग्णांसाठी गोल्ड स्टँण्डर्ड स्वेट क्लोराईड चाचणी

खंडणी वसुलीच्या आरोपात ईडिने देशमुख यांना अटक केली आहे. आज विशेष पीएमएलए न्यायालयात त्यांना रिमांडसाठी हजर करण्यात आले. माझ्याजवळ असलेली सर्व माहिती मी दिली आहे, तपास अधिकारी रोज माझी तासनतास चौकशी करतात, दोनशेहून अधिक प्रश्नांची उत्तरे मी दिली आहे. आता माझ्याकडे सांगण्यासारखे काही नाही, असे त्यांनी सांगितले. न्यायालयाला एक स्वलिखित पत्रही त्यांनी दिले. देशमुख यांच्या वतीने वकील विक्रम चौधरी आणि वकील अनिकेत निकम यांनी बाजू मांडली.

या प्रकरणात बडतर्फ पोलीस निरिक्षक सचिन वाझे आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना अद्याप समन्स का नाही बजावले. वाझे आणि सिंह आरोपी असूनही त्याबद्दल ईडि अवाक्षर काढत नाही, वाझेचा जबाब एवढ्या दिवसांत का नाही नोंदविला, म्हणजे देशमुख वाईट आणि वाझे चांगला आहे का, खरंतर यामध्ये त्याची भूमिका मोठी आहे, पण त्याला अटकही केलेले नाही, असा युक्तिवाद चौधरी यांनी केला. दिवसातून आठ नऊ तास चौकशी करण्याच्या नावाखाली माझा मानसिक छळ केला जात आहे. त्यामुळे माझी प्रक्रुती आणि मी करत असलेले सहकार्य पाहून मला न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी देशमुख यांनी केली होती.

हेही वाचा: विधान परिषदेवर रामदास कदम यांच्याजागी वरुण सरदेसाई की, सचिन अहिर?

ईडिकडून एड श्रीराम शिरसाट यांनी बाजू मांडली. देशमुख मोजकीच उत्तर देत आहेत, त्यामुळे वाझेकडून माहिती घ्यायची आहे. तो सध्या मुंबई पोलिसांच्या कोठडीत आहे. देशमुख यांचा जबाब देखील नोंदवायचा आहे त्यामुळे किमान दोन दिवस कोठडी द्या, अशी मागणी त्यांनी केली. विशेष न्या. एच एस सातभाई यांनी ता. 15 पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आज सुनावणी दरम्यान हजर होत्या.

देशमुख जेव्हा न्यायालयात आले तेव्हा न्यायालयाबाहेर त्या होत्या. देशमुख यांनी त्यांना नमस्कार केला. देशमुख यांच्या वकिलांशीही सुळे यांनी चर्चा केली. अनील देशमुख यांचा मुलगा ऋषीकेशने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र आज त्यांना दिलासा मिळाला नाही. यावर ता 20 रोजी पुढील सुनावणी होणार आहे. ईडिने ऋषीकेश यांना समन्स बजावले आहे. मात्र तेदेखील चौकशीला हजर झालेले नाही.

loading image
go to top