Chandrakant Patil l चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना प्रेमळ सल्ला; म्हणाले,गृहमंत्रीपद देऊ नका... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil And Uddhav Thackeray

चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना प्रेमळ सल्ला; म्हणाले...

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहचले आहेत. राज्यातील गृहविभागाच्या कारभारावरून वळसे-पाटील यांच्यावर काॅंग्रेस आणि शिवसेना नाराज आहे. पुरावे देऊन कारवाई होत नसल्याने ही नाराजी असल्याचे म्हणणे आहे. यासंदर्भात वळसे पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. यावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्र्यांना प्रेमाचा सल्ला दिला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपद राष्ट्रवादीला देऊ नये. कारण तेच अडचणीत येतील.काय कराव हे उध्दवजीनी ठरवावं. आम्ही खूप वर्ष एकत्र कामं केलं आहे. माझ व्यक्तीशा त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून हा सल्ला देत असल्याचे त्यांनी सांगितले. गृहमंत्रीपद राष्ट्रवादीच्या हातात दिलात तर मातोश्रीवर देखील कॅमेरा लागेल असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. तुम्ही फायनान्स इतर पद त्यांना दिलीत. सगळच त्यांच्या हातात दिल तर बाकीच्यांनी काय करायचं असा सवालही त्यांनी विचारला.

काय आहे प्रकरण

जाहीर कार्यक्रमात हातात तलवार घेऊन उंचावल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावरून कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काँग्रेसचे नाराजी नाट्य पाहायला मिळाले. मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि वळसे पाटील यांच्यात खलबतं सुरू झाली आहेत.भाजप नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारीवरुन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या विरोधात शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत वांद्रे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. कंबोज यांनी ट्वीट करत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना कारवाई करण्याची विनंती केली.

Web Title: Dilip Walse Patil Issue Chandrakant Patil Advice To The Cm Uddhav Thackeray Political

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top