"बाई थोडी कळ काढा ही शिवसेनेची..."; दिपाली सय्यदचा नवनीत राणांना टोला

राणा बाईला शिवसेना नावाचा रोग झाला आहे असंही त्या म्हणाल्या आहेत.
Dipali Sayyad
Dipali SayyadSakal

Eknath Shinde: महाराष्ट्रातील राजकारणाला दिवसेंदिवस वेगळे वळण मिळत असून आज राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हेसुद्धा शिंंदे गटाला मिळाले आहेत. तर खासदार नवनीत राणा यांच्यावर दिपाली सय्यद यांनी टीका केली आहे. राणा बाई थोडी कळ काढा सुट्टीवर गेलेली पोरं परत येतील असं सय्यद यांनी म्हटलं आहे.

(Dipali Sayyad News Updates)

"राणा बाईला शिवसेना नावाचा रोग झाला आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याची घाई झाली आहे. बाई थोडी कळ काढा हि शिवसेनेची शाळा आहे, सुट्टीवर गेलेली पोर परत येतील आल्यानंतर पहिले तुमचा अमरावतीतून सुफडा साफ करतील. बोगस कागदपत्रे..." असं ट्वीट दिपाली सय्य्द यांनी केलं आहे.

Dipali Sayyad
शिंदे यांची भूमिका पक्षाने समजून घ्यावी - उदय सामंत

"सुरक्षा महाराष्ट्रातच सोडून ढुंगणाला पाय लावून पळालेल्यांना आम्ही संरक्षण देणार नाही. आमदारांना संरक्षण असतं, त्यांच्या कुटुंबियांना नसतं." असं शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले होते त्यानंतर राणा यांनी त्यांच्यावर टीका केली होती. "संजय राऊत हे जबाबदार व्यक्ती असताना म्हणतायत की आमदारांना संरक्षण आहे, त्यांच्या कुटुंबियांना नाही. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे संजय राऊतजी? की आपण त्यांच्या परिवारांना मारताय, जो परत नाही आला त्यांच्या परिवाराला मारण्याची सरळसरळ धमकी तुम्ही देताय" अशी टीका राणा यांनी केली होती. त्यानंतर दिपाली सय्यद यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय.

Dipali Sayyad
कोल्हापुरात राजेश क्षीरसागरांचं पोस्टर फाडलं; रवी इंगवलेंसह 10 जणांवर गुन्हा

सध्या महाविकास आघाडी सरकार धोक्यात असून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाचे ४० पेक्षा जास्त आमदार घेऊन बंड पुकारले आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकापासून राज्यात राजकीय नाट्य चालू आहे. तर ही शिवसेनेची खेळी आहे असा दावा दिपाली सय्यद यांनी केला आहे. बंड केलेले आमदार परत आल्यावर तुमचा अमरावतीतून सुफडा साफ होईल अशी टीका त्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com