दिग्दर्शिका सई परांजपे नाट्यसंमेलनाच्या उद्‌घाटक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 February 2020

नाट्यपंढरी सांगली येथे २७ मार्च रोजी होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती नाट्यपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.

मुंबई - नाट्यपंढरी सांगली येथे २७ मार्च रोजी होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती नाट्यपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

‘सख्खे शेजारी’, ‘जास्वंदी’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘माझा खेळ मांडू दे’ या दर्जेदार नाटकांचे लेखन सई परांजपे यांनी केले. ‘चष्मेबद्दूर’, ‘स्पर्श’, ‘कथा’ या चित्रपटांच्या संवेदनशील लेखिका व दिग्दर्शिका म्हणून सई परांजपे यांची ओळख आहे.

बोधचिन्हाचे उद्या अनावरण
नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण १०० व्या स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते २७ फेब्रुवारीला यशवंत नाट्य मंदिर येथे होणार आहे. या वेळी सई परांजपे आणि ९९ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी; तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहतील. १०० व्या नाट्यसंमेलनाची सांगता १४ जून रोजी गो. ब. देवल स्मृतिदिनी मुंबईत होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Director Sai Paranjpe Natyasammelan