esakal | ...तर निर्बंध कमी होतील, राजेश टोपे यांचं सूचक विधान
sakal

बोलून बातमी शोधा

...तर निर्बंध कमी होतील, राजेश टोपे यांचं सूचक विधान

...तर निर्बंध कमी होतील, राजेश टोपे यांचं सूचक विधान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत असल्यामुळे काही जिल्ह्यात नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, पूर्णपणे निर्बंध हटवण्यात आलेले नाहीत. मागील काही दिवसांपासून राज्यातील निर्बंध कमी करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. याला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जालन्यात पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी नियमात शिथिलता येणार, असल्याचे संकेत दिले.

जालन्यात पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि निर्बंध कधी शिथिल केले जाणार याबद्दल माहिती दिली. राज्यातील कोरोना स्थितीचा टास्क फोर्स अभ्यास करत आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना नियमांबद्दल नवीन निर्णय जाहीर करतील, असं सूचक वक्तव्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं.

ज्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, त्या जिल्ह्यातील निर्बंध कमी करण्यासाठी टास्क फोर्स अभ्यास करत आहे. दोन दिवसांत हा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सपूर्द केला जाईल. त्यानंतर राज्यातील निर्बंधाचा निर्णय घेण्यात येईल, असे टोपे म्हणाले.

हेही वाचा: लाव रे तो व्हिडिओ! राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवल्या क्लिप्स

ज्या शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आलेली आहे त्या शहरातील सर्व दुकानांची उघडे ठेवण्याची वेळ वाढविण्याचा विचार होऊ शकतो. यानुसार सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिली जाईल. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. राज्यात आधीच कोरोनाचं संकट होतं. त्यात पूरस्थिती परिस्थिती उद्भवल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणखीच अडचणीत सापडला आहे. राज्यातील लॉकडाउनच्या कालावधीला दोन महिने उलटून गेले आहेत. त्यामुळे लोकांच्या रोजगाराचाही प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. उद्धव ठाकरे सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. त्यामुळेच कदाचीत आज, निर्बंधामध्ये मोठी सूट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

loading image
go to top