ST Strike: सरकारची विरोधकांसोबत चर्चा; तोडग्याची शक्यता! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis and Anil Parab

ST Strike : सरकारची विरोधकांशी चर्चा; तोडग्याची शक्यता!

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप आणि त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेले आरोप प्रत्यारोप यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. त्यातच आज महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात चर्चा झाली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आज फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी वेगवेळ्या विषयांवर चर्चा पार पडली असून, त्यानंतर अनिल परब यांनी या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्दावर देखील चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावर चर्चा झाली असून, देवेंद्र फडणवीस यांनी काही सुचना केल्या आहेत अशी माहिती यावेळी अनिल परब यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी यावेळी सकारात्मक चर्चा झाली असून, त्यांनी काही सुचना केल्या आहेत. शासणाचं मत घेऊन त्या सुचनांवर विचार करू असंही परब यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यामुळे आता मुद्यावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

हेही वाचा: "शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही"

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अजून सुटलेला नाही, आपण वारंवार कर्मचाऱ्यांना आवाहन करतोय. विलीणीकरणाची मागणी ही हायकोर्टाने निर्देश दिलेल्या कमिटीसमोर आहे. आम्ही चर्चा करायला तयार आहोत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

टॅग्स :MSRTC