"शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही" | Kirit Somaiya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kirit somaiyya

"शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही"

मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या (bjp leader kirit somaiya) यांनी ट्विट करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना लक्ष्य केलंय. ''शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा धमक्यांना आम्ही घाबरत नाही, धमकी कोणाला?'' असा थेट सवाल करत गंभीर आरोप केलेत. महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच असे वक्तव्य करत काय म्हणाले सोमय्या?

ट्वीटमुळं चर्चेला उधाण

राज्यात एकाचवेळी सक्तवसुली संचालनालयाकडून (ED)धाडसत्र सुरू आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे नेतेही ईडीच्या रडारवर आहे. तर, भाजप नेते किरीट सोमय्या हे देखील महविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांवर गंभीर आरोप होत आहे. अशातच किरीट सोमय्यांनी केलेल्या एका ट्वीटमुळं चर्चेला उधाण आलं आहे.

हेही वाचा: 'दुसरा गाल पुढे करण्यासाठी...' कंगनाला गांधीजींचे पणतू तुषार गांधींचे उत्तर

फक्त अनिल देशमुखच नाही....तर...

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. धमकी कोणाला ? सुप्रीम कोर्टला, हायकोर्टला, ईडीला, भाजपाला की किरीट सोमैयांना? फक्त अनिल देशमुख नाही, जितेंद्र आव्हाडांची पण अटक झाली, आनंद अडसूळ यांची पण अटक झाली, महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच असे सांगत सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.

हेही वाचा: 'विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी फडणवीसांना भेटलोय'

loading image
go to top