Nitesh Rane: दिशा सालियनला न्याय देण्यासाठी राणेंनी मागितली महापौरांची वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

disha salian

खऱ्या आरोपींना शिक्षा होण्यासाठी एक महिला म्हणून तुम्ही पुढे या. मी येतो तुमच्या बरोबर महिला आयोगाकडे.

दिशा सालियनला न्याय देण्यासाठी राणेंनी मागितली महापौरांची वेळ

मुंबई: सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्युच्या आधी ६ दिवस म्हणजेच ८ जून २०२० ला दिशा सालियनने (disha salian) मुंबईतील मालाड (Malad) मधील इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्युनंतर दिशा सालीयनचं प्रकरण देखील चर्चेत आलं. त्यानंतर तिची बदनामी झाली आता तिला न्याय मिळावा यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांना आवाहन केले आहे. दिशाला न्याय देण्यासाठी एक महिला म्हणून तुम्ही पुढे या असे आवाहन राणे यांनी ट्विट करत केले आहे.

नितेश राणे म्हणाले, महापौर ताई, दिशा सालियनची मृत्यूनंतरही बदनामी झाली.खरंच तीला न्याय मिळालाच पाहीजे. म्हणून तिच्या खऱ्या आरोपींना शिक्षा होण्यासाठी एक महिला म्हणून तुम्ही पुढे या. मी येतो तुमच्या बरोबर महिला आयोगाकडे. तुमची वेळ आणि तारीख कळवा! असे नितेश राणे म्हणाले.

हेही वाचा: रश्मी ठाकरे नंतर स्मिता ठाकरे भाजपच्या निशाण्यावर; राणे म्हणाले...

प्रा. अंकिता पिसुड्डे हिला भरचौकात पेट्रोल ओतून जाळल्या प्रकरणी आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आता दिशाला न्याय मिळावा यासाठी नितेश राणे यांनी महापौरांना साकडे घातले आहे.

Web Title: Disha Salian Death Case Justice Nitesh Rane Appeal Mayor Kishori Pednekar Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top