Shivsena News: शिवसेनेच्या ४० आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा पुन्हा लांबणीवर! आता शेवटची संधी...

Shivsena Case
Shivsena CaseEsakal
Updated on

शिंदे गटातील आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा आता लांबणीवर गेला आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांना मुदतवाढ मिळाली आहे. दोन आठवड्यांची मुदत आमदारांना दिली. खुलासा कींवा उत्तर देण्यासाठी शिंदे गटातील आमदारांना ही शेवटची संधी आहे.

आमदार अपात्रतेसाठी शिवसेनेच्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुदतवाढ दिली आहे.आमदारांना खुलासा करण्यासाठी शेवटची संधी आहे.

पावसाळी अधिवेशनानंतर सुनावणीस होणार सुरुवात होणार आहे. नोटीसीचा खुलासा दिलेल्या आमदारांना पुरावे सादर करावे लागणार आहेत. विधीमंडळातील खात्रीलायक सुत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आह.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जुलै 2022 मध्ये कोणत्या पक्षाला व्हिप नेमण्याचा अधिकार आहे या मुद्द्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ शकतात.

Shivsena Case
Narhari Zirwal: झिरवळ निघाले राज्यपालांच्या भेटीला! राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या

राहुल नार्वेकर यांनी सोमवारी आढावा बैठक घेतला आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी सुरू होण्यापूर्वी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 40 शिवसेना आमदार आणि उद्धव ठाकरे गटातील 14 आमदारांना उत्तर दाखल करण्यास सांगितले. मात्र आता शिंदे गटातील आमदारांना 2 आठवड्यांची मुदतवाढ मिळाली आहे.

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब म्हणाले, राहुल नार्वेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवावे लागेल, ज्यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड केला.

“काय कायदेशीर आणि काय बेकायदेशीर, कोण पात्र आणि कोण अपात्र याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. सभापतींना 16 आमदारांना अपात्र ठरवावे लागेल आणि त्यांनाही हे चांगले माहीत आहे," असे परब म्हणाले.

गेल्या वर्षी जून आणि जुलैमध्ये एकनाथ शिंदे यांच्याशी निष्ठावान 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत बंड केला होता.

Shivsena Case
Radhanagari Dam : तीन तासांत राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले; पंचगंगेच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.