मोठी बातमी ! जिल्हा बॅंकांनी वाटले शेतकऱ्यांना दहा हजार कोटींचे कर्ज; "या' बॅंकांचा मात्र हात आखडताच 

तात्या लांडगे 
Tuesday, 21 July 2020

लॉकडाउनमुळे महात्मा फुले कर्जमाफी योजनेस विलंब झाला. या पार्श्‍वभूमीवर कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जवाटप करून बॅंकांनी शासनाकडे येणेबाकी दाखवावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले. मात्र, बहुतांश जिल्हा बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांवर बोट ठेवत कर्जवाटप केलेच नाही. या पार्श्‍वभूमीवर सरकारने कर्जमाफीस पात्र लाभार्थींना लाभ दिला. त्यानंतर कर्जवाटपास गती आली आणि 17 जुलैपर्यंत राज्यातील 29 जिल्हा बॅंकांनी उद्दिष्टाच्या 75 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक कर्जवाटप केले. तत्पूर्वी, अडचणीतील जिल्हा बॅंकांना राज्य सहकारी बॅंकेने कर्जाच्या स्वरूपात एक हजार 882 कोटींची मदत केली. त्यामध्ये गडचिरोली, अकोला, नगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, उस्मानाबाद, यवतमाळ या बॅंकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बॅंकांपैकी बहुतांश बॅंकांनी कर्जवाटपाचे 30 टक्‍केदेखील उद्दिष्ट पूर्ण केले नसल्याचेही चित्र आहे. 

सोलापूर : राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या बळिराजाला खरीप हंगामात जिल्हा बॅंकांनी 13 हजार कोटींचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्टे दिले. त्यानुसार 29 जिल्हा बॅंकांनी आतापर्यंत राज्यातील सुमारे 23 लाख शेतकऱ्यांना 10 हजार 97 कोटींचे कर्जवाटप केले आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, रायगड, अमरावती व नागपूर या जिल्हा बॅंकांनी हात आखडता घेत 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी कर्जवाटप केले आहे. 

हेही वाचा : धक्कादायक : "या' सबजेलमधील तीन कैद्यांचे पलायननाट्य ! अखेर पोलिसांनी केले शिताफीने जेरबंद 

लॉकडाउनमुळे महात्मा फुले कर्जमाफी योजनेस विलंब झाला. या पार्श्‍वभूमीवर कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जवाटप करून बॅंकांनी शासनाकडे येणेबाकी दाखवावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले. मात्र, बहुतांश जिल्हा बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांवर बोट ठेवत कर्जवाटप केलेच नाही. या पार्श्‍वभूमीवर सरकारने कर्जमाफीस पात्र लाभार्थींना लाभ दिला. त्यानंतर कर्जवाटपास गती आली आणि 17 जुलैपर्यंत राज्यातील 29 जिल्हा बॅंकांनी उद्दिष्टाच्या 75 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक कर्जवाटप केले. तत्पूर्वी, अडचणीतील जिल्हा बॅंकांना राज्य सहकारी बॅंकेने कर्जाच्या स्वरूपात एक हजार 882 कोटींची मदत केली. त्यामध्ये गडचिरोली, अकोला, नगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, उस्मानाबाद, यवतमाळ या बॅंकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बॅंकांपैकी बहुतांश बॅंकांनी कर्जवाटपाचे 30 टक्‍केदेखील उद्दिष्ट पूर्ण केले नसल्याचेही चित्र आहे. 

हेही वाचा : अरे व्वा ! अक्कलकोटच्या शेतकऱ्याने निवडली सहा महिन्यांत साडेसात लाख रुपयांचे उत्पन्न देणारी शेती ! पण कुठली? वाचा सविस्तर 

कर्जवाटपाची राज्यातील सद्य:स्थिती 

  • एकूण जिल्हा बॅंका : 29 
  • कर्जवाटपाचे "खरीप' उद्दिष्ट : 13,085 कोटी 
  • राज्य बॅंकेकडून कर्जमर्यादा मंजूर : 8,205.60 कोटी 
  • राज्य बॅंकेकडून कर्जवाटप : 1,882.04 कोटी 
  • जिल्हा बॅंकांचे कर्जवाटप : 10,097 कोटी 

कोल्हापूर "डीसीसी' कर्जवाटपात अव्वल 
राज्यातील 29 जिल्हा बॅंकांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्हा बॅंकेने सर्वाधिक उद्दिष्टाच्या 153 टक्‍के (10.48.39 कोटी) कर्जवाटप केले आहे. दुसरीकडे सातारा जिल्हा बॅंकेने एक हजार 243 कोटी (131 टक्‍के), नांदेड जिल्हा बॅंकेने 242 कोटी (131 टक्‍के), भंडारा बॅंकेने 270 कोटी (104 टक्‍के), गोंदिया जिल्हा बॅंकेने 137 कोटी (101 टक्‍के) तर सोलापूर जिल्हा बॅंकेने 144 कोटी (94 टक्‍के) कर्जवाटप केल्याचे राज्य बॅंकेच्या 17 जुलैच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District banks felt loans of Rs 10,000 crore to farmers