esakal | "कोरोना' उपाययोजनांसाठी जिल्ह्यांना मिळाला 95 कोटी रुपयांचा निधी 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

यासाठी वापरता येणार निधी 
बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष (घरातील विलगीकरण वगळून) स्थापन करणे, त्यासाठी तात्पुरती निवास व्यवस्था, अन्न, कपडे, वैद्यकीय देखभाल, नमुने गोळ्या करण्यासाठी खर्च, तपासणी, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगसाठी मदत, क्‍लस्टर कंटेनमेंट संदर्भात कार्यवाही, अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करणे, उपभोग्य वस्तू, अग्निशमन, पोलिस, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधनांचा खर्च, व्हेंटिलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र, थर्मल स्कॅनर इत्यादी साधनांचा खर्च या निधीच्या माध्यमातून भागविला जाणार आहे. 

"कोरोना' उपाययोजनांसाठी जिल्ह्यांना मिळाला 95 कोटी रुपयांचा निधी 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला विविध उपाययोजनांच्या खर्चापोटी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 95 कोटी 57 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यापूर्वी 339 कोटी 56 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामध्ये आता 95 कोटी 57 लाख रुपयांची भर पडली आहे. हा निधी त्या-त्या जिल्ह्याच्या विभागीय आयुक्तांकडे व सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्यात आला आहे. 

कोकण विभागीय आयुक्तांच्या अंतर्गत येणाऱ्या ठाणे जिल्ह्यासाठी सर्वाधिक 40 कोटी रुपये, मुंबई शहर जिल्ह्यासाठी 16 कोटी 28 लाख रुपये असे मिळून एकूण कोकण विभागासाठी 56 कोटी 28 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्तांच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये औरंगाबादसाठी आठ कोटी, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यासाठी प्रत्येकी 75 लाख रुपये, हिंगोली व बीड जिल्ह्यासाठी प्रत्येकी पन्नास लाख रुपये, लातूरसाठी एक कोटी रुपये व उस्मानाबादसाठी 25 लाख देण्यात आले आहेत. संपूर्ण मराठवाडा विभागासाठी 12 कोटी 50 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

अमरावती विभागीय आयुक्तांच्या अंतर्गत येणाऱ्या अकोला जिल्ह्यासाठी एक कोटी, यवतमाळसाठी दोन कोटी 25 लाख रुपये, बुलढाण्यासाठी पन्नास लाख रुपये देण्यात आले आहेत. अमरावती विभागासाठी एकूण 3 कोटी 75 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. पुणे महसूल विभागातील पुणे ग्रामीण साठी दहा कोटी, सातारा व सांगली जिल्ह्यासाठी प्रत्येकी दोन कोटी, सोलापूर जिल्ह्यासाठी तीन कोटी व कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक कोटी असे मिळून पुणे विभागासाठी 18 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाला पाच कोटी रुपये देण्यात आले आहेत.