Diwali Package : रेशनकार्ड धारकांना दिवाळी पॅकेज जाहीर; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

अवघ्या १०० रुपयांत रेशनकार्ड धारकांना काय काय मिळणार? जाणून घ्या
ration shop
ration shopesakal

मुंबई : दिवाळी सणात गोरगरिबांसाठी दिलासा देण्यासाठी शिंदे सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अवघ्या १०० रुपयांत एक किलो रवा, चनाडाळ, साखर आणि तेल दिवाळीच्या सणासाठी मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Diwali package announced for ration card holders a big decision of Maharashtra cabinet)

देशासह महाराष्ट्रात दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या सणाला घरोघरी गोडधोड आणि फराळ करण्याची पद्धत आहे. हा सण गोरगरीबांनाही साजरा करता यावा यासाठी सरकारनं हा पॅकेजचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील ७ कोटी कुटुंबांना याचा फायदा मिळणार आहे.

ration shop
CNG-PNG Price Hike: महागाईचा भडका! ऐन सणासुदीत सीएनजी, पीएनजी दरात मोठी वाढ!

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,"आज आमच्या कॅबिनेटने खूपच महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दिवाळीनिमित्त १ लाख ६२ हजार रेशनकार्ड धारकांना म्हणजेच ७ कोटी लोकांना साखर, रवा, चनाडाळ आणि तेल याचा एक पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

हा महत्वाचा निर्णय घेतल्यानंतर आता त्याच्या वाटपाची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com