देवेंद्र फडणवीस म्हणाले, दलित असो की ब्राह्मण सर्व भारतीयांचा DNA एकच
आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत हे सांगण्यासाठी एक नवीन थेअरी इंग्रजांनी आणली. त्यांनी सांगितलं की मध्य युरोपातून आर्य संघर्ष करत या ठिकाणी आले. त्यावेळी द्रविड या भागात राहात होते. आर्य आणि द्रविड यांच्यात लढाई झाली. द्रविडांना दक्षिणेत टाकलं आणि आर्यांनी बसून मोहेंजदाडो आणि हडप्पा तयार केला म्हणजेच कुणी तर युरोपियांनी तयार केला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपण तेच शिकत राहिलो आहोत. मात्र अंदमानचे आदिवासी असोत, दक्षिणेतील नार असोत किंवा उत्तर प्रदेशातले दलित किंवा अगदी बंगालचे ब्राह्मण असोत सगळ्यांचा डीएनए एकच आहे. सगळ्या भारतीयांचा बाप एकच आहे. त्यामुळेच कुणीतरी आर्य, कुणी द्रविड आहे. कुणी ब्राह्मण कुणी क्षत्रिय आहे हा सगळा वाद संपला आहे. असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
यावेळी ते म्हणाले, यासंदर्भात जेव्हा देशी आणि परदेशी इतिहासकारांनी संशोधन केलं तेव्हा कळलं की हे सगळं चुकीचं आहे. प्रो. शिंदे आणि अभिजित चावडा असतील यांनी यासंदर्भातलं सत्य समोर आणलं आहे. संघर्ष झाला तर त्याचे पुरावे, खुणा असायला हव्यात. परंतु डाव्या विचारसणीचे इतिहासकारांनी हे मान्य करण्यास मनाई केली होती. युद्ध न करता ते फिरत राहिले, मग द्रविड बाजूला झाले. त्यावेळी कुठल्या मार्गाने आले ते सांगा हा प्रश्न विचारला गेला. त्यावेळी संशोधकांनी एक विचार समोर मांडला की, भारतातली संस्कृती आणि सभ्यता जगातली सर्वात जुनी आहे. त्यासाठीच्या जुन्या गोष्टी, संदर्भ शोधून काढल्या पाहिजेत असेही फडणवीसांनी सुचवलं आहे.

Web Title: Dna Of All Indian Is Same Says Devendra Fadnavis In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..