वाहतुकीचा कोणता नियम मोडल्यावर किती दंड, माहितीय का? नियम पाळा, नाहीतर एकावेळी होईल 19000 दंड; ड्रेस नसलेल्या रिक्षा चालकास 1500 दंड; चुकीचा दंड होईल दुरुस्त

रस्ते अपघात कमी करणे अन् बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी म्हणून आता वाहतूक नियम मोडणाऱ्यांच्या दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे. दंडाची रक्कम किमान ५०० ते १० हजारांपर्यंत आहे. तर कधी-कधी एका वाहनाला एकाचवेळी १९ हजार रूपयांपर्यंत दंड होवू शकतो.
traffic police
traffic policesakal
Updated on

सोलापूर : रस्ते अपघात कमी करणे अन् बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी म्हणून आता वाहतूक नियम मोडणाऱ्यांच्या दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे. दंडाची रक्कम किमान ५०० ते १० हजारांपर्यंत आहे. तर कधी-कधी एका वाहनाला एकाचवेळी १९ हजार रूपयांपर्यंत दंड होवू शकतो. त्यामुळे वाहनचालकांनी शिस्तीत वाहन चालवावे, वाहतूक नियम पाळावेत, नाहीतर दंडाची रक्कम एवढी होईल की वाहन विकले तरी दंडाची भरपाई होणार नाही.

विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, सीटबेल्टचा वापर न करता चारचाकी चालविणे, मोबाईल टॉकिंग, दुचाकीस्वार ट्रिपलसीट, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, वाहनाचा विमा (इन्शुरन्स) नसणे, फॅन्सी नंबरप्लेट, नंबरप्लेटवर छेडछाड, वाहतूक पोलिसांनी हात करूनही वाहनचालक तसेच पसार होणे, वाहन नागमोडी पद्धतीने चालविले, रिक्षा चालकास ड्रेसकोड नसणे, मद्यपान करून वाहन चालविणे अशा प्रमुख कारणांसाठी किमान ५०० ते १० हजार रुपयांपर्यंत दंड केला जात आहे.

आता हेल्मेटविना वाहन चालविणाऱ्याचा दंड एक हजार रुपये करण्यात आला आहे. दुसरीकडे वाहनाच्या सायलेंन्सरमध्ये छेडछाड केल्यास किंवा मोठ्या आवाजाचे सायलन्सर असल्यास पाचशे रुपये दंड असून, कारवाईवेळी ते सायलेन्सर काढून घेतले जाणार आहे. दुसरी विशेष बाब म्हणजे नंबरप्लेट फॅन्सी नाही, पण त्यावर काहीतरी लिहिलेले असल्यास त्यासाठीही देखील ५०० रूपयांचा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे सर्वात भारी पर्याय म्हणजे वाहतूक नियमांचे पालन करणे हाच आहे.

बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त लावण्यासाठी कारवाई

बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी, यासाठी पोलिस आयुक्त एम. राजकुमार व पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. शहरातील जवळपास नऊ हजार बेशिस्त वाहनचालकांना २७ जुलैला होणाऱ्या लोकअदालतीच्या अनुषंगाने समन्स बजावले आहे. त्यातील दीड हजार जणांनी दंड भरला असून, उर्वरित चालकांकडूनही दंड भरून घेतला जात आहे.

- सुधीर खिरडकर, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक), सोलापूर शहर

चुकीचा दंड होईल दुरुस्त

‘ई-चालान’वर एखाद्या वाहनचालकास चुकीच्या पद्धतीने दंड लागला असल्यास त्या वाहनचालकास पुराव्यानिशी शहराच्या सहायक पोलिस आयुक्तांकडे किंवा ग्रामीणमधील वाहतूक शाखेकडे अर्ज करता येतो. याशिवाय तो वाहनचालक स्वत:च्या मोबाइलमध्ये महा-ट्रॅफिक ॲप डाऊनलोड करून त्यातील ‘ग्रेव्हिन्स’वर क्लिक करून पुराव्यानिशी माहिती भरूनही चुकीचा दंड माफ करण्यासाठी अर्ज करू शकतो. त्या अर्जाची पडताळणी करून चुकीच्या पद्धतीने दंड लागला असल्यास तो माफ केला जातो.

...तर एकाचवेळी १९ हजारांचा दंड

एखादा दुचाकीस्वार ट्रिपलसीट जात असताना, त्याला वाहतूक अंमलदाराने हात करूनही तो न थांबता तसाच पुढे गेल्यास त्याला त्याचा ५०० रुपये दंड, ट्रिपलसीटचा एक हजार रूपयाचा दंड, मोबाइल टॉकिंग करत असल्यास त्याचा एक हजार रुपये दंड, पहिला दंड प्रलंबित आहे आणि आता पुन्हा हात करूनही तो न थांबता तसाच जात असल्यास दीड हजार रुपये त्याचा दंड, दुचाकीचा इन्शुरन्स नसल्यास दोन हजार रुपये दंड, फॅन्सी नंबरप्लेट असल्यास एक हजार रुपये दंड, हेल्मेट नसल्यास एक हजार रुपयांचा दंड आणि नागमोडी पद्धतीने वाहन चालविल्याचा ५०० रुपये दंड, मोबाईल टॉकिंगचा पहिला दंड पेन्डिंग असल्यास दुसऱ्यावेळी दहा हजार रुपयांचा दंड, दुचाकी चालविताना ट्रिपलसीटमुळे चालकाला अडथळा झाल्यामुळे त्याचा ५०० रुपये दंड, असा एकूण १९ हजार रुपयांचा दंड एकावेळी होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com