Nagpur: 'स्वीमिंग पूल'मध्ये बुडून डॉक्टरचा मृत्यू; नागपुरात धक्कादायक घटना

Nagpur News
Nagpur Newsesakal

कळमेश्वरः नागपूरच्या कमळेश्वर येथे जलतरण तलावामध्ये बुडून एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. कळमेश्वर नगर परिषदेच्या जलतरण तलावात पोहत असताना डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ४१ वर्षीय राकेश दुधे (रा. कळमेश्वर) असे डॉक्टरांचे नाव आहे. डॉ. दुधे यांचे कळमेश्वर स्टेशन रोडवर श्री हॉस्पिटल आहे. ते नेहमीप्रमाणे सायंकाळी सहा वाजता पोहायला गेले होते.

Nagpur News
10th SSC Result 2023: उद्या १ वाजता लागणार दहावीचा निकाल, या वेबसाइटवर मिळेल संपूर्ण माहिती

बुधवारी ते पोहायला गेले असता त्यांचा तोल गेला आणि पाण्यात पडले. तलावात उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षकाला त्यांनी हातवारे करून माहिती दिली. प्रशिक्षक धावून गेला पण तोपर्यंत त्यांच्या नाकातोंडातून पाणी गेले होते. पाण्यातच ते बेशुध्द झाले.

त्यांना तात्काळ जवळच असलेल्या कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तीन वर्षे बंद असलेल्या या जलतरण केंद्राचा नुकताच मार्च २३ ला शुभारंभ करण्यात आला होता. डॉक्टरच्या मृत्यूची बातमी कळताच नागरिकांनी जलतरण केंद्राकडे धाव घेतली. अधिक तपास कळमेश्वर पोलिस करीत आहेत.

Nagpur News
Gold Silver Rate: सोन्याच्या भावात 330 रुपयांनी घसरण, चांदीही स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

येथील कंत्राटदाराने पैसे घेऊनही आवश्यक त्या सुविधा उपलब्ध न केल्याने आज एका तरुण डॉक्टरचा बळी गेल्याचा आरोप होत आहे. पालिकेने संबंधित कंपनीचे कंत्राट रद्द करून कंत्राटदाराविरूध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शहर भाजप महामंत्री प्रशांत इखार यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com