St Employee Issue : उद्योग मंत्र्यांनी अवघ्या सहा तासात एसटी कामगारांचे प्रश्न लावले मार्गी

एसटी कामगाराच्या आर्थिक मागण्यांसाठी राज्य एसटी कामगार संघटना मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषणाला बसले होते.
MSRTC ST Bus
MSRTC ST Busesakal

मुंबई - एसटी कामगाराच्या आर्थिक मागण्यांसाठी राज्य एसटी कामगार संघटना मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषणाला बसले होते. गौरी गणपती सण तोंडावर असताना एसटी कर्मचार्यांचे आंदोलन चिघळले असते तर एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता होती.

मात्र उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अवघ्या सहा तासात तोडगा काढण्यात यश मिळवलं. यासोबत रात्री मुख्यमंत्र्याची भेट घेवून एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता देण्याचा मार्ग मोकळा केला.

एसटी कामगारानी विविध मागण्यासाठी यावेळी पुन्हा उपोषण अस्त्राचे हत्यार उपसले होते. एकीकडे मराठा आरक्षणाची धग दुसरीकडे एसटी कामगारांचे आंदोलन अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या एकनाथ शिंदे यांनी त्यांचे विश्वासू असलेले उदय सामंत यांना एसटी कामगारासोबत बोलण्याची जबाबदारी सोपवली.

यापूर्वी दिवाळीच्या तोंडावर एसटी कामगारांनी संप पुकारला होता. तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये संप झाला होता त्यावेळी सरकारला सहा महिने हा संप मोडून काढता आला नाही. या संपामुळे एसटी झालेले नुकसान आजपर्यंत भरून निघाले नाही.

मात्र यावेळी उदय सामंत यांनी अवघ्या सहा तासात यशस्वी मध्यस्थी करून कामगारांचा संप मागे घेतला. त्यामुळे एसटी कामगारांमध्ये सामंत यांचे कौतुक केले जात असून, संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनीही आभार मानले आहे.

दिवसभरातील घडामोडी

बेमुदत आमरण उपोषणाचा पहिल्याच दिवशी दुपारी १२ वाजता सह्याद्री अतिथी गृहावर आंदोलन करणाऱ्या संघटनेला चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले. दोन तासाच्या चर्चेत मागण्या समजून घेत उदय सामंत यांनी एसटी कर्मचारी संघटनेला दिलासा दिला. त्यानंतर रात्री उदय सामंत यांच्या बंगल्यावर चार तास बैठक झाली.

यामध्ये परिवहन विभागाचे प्रधान सचिव आणि एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ज्यामध्ये उदय सामंत यांनी स्वतः पुढाकार घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडून त्यावर सकारात्मक शेरा घेत. एसटी कर्मचारी संघटनेला लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन करणाऱ्या संघटनेलाही यश आले.

असे दिले लेखी आश्वासन

- एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता मंजूर

- सण उत्सव अग्रीमाची रक्कम १०,००० रुपयावरून शासन धोरणाप्रमाणे १२,५०० इतकी वाढविण्यालाही मान्यता

- मागील महागाई भत्त्याच्या थकबाकी तसेच घरभाडे भत्ता व वेतनवाढीतील फरकाबाबत पुढील १५ दिवसांत मुख्यमंत्री अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री तथा मंत्री, वित्त व नियोजन यांच्यासमवेत महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजन

- कामगार करार थकबाकी (रुपये ४८४९ कोटी), ५०००, ४०००, २५०० वेतनवाढी मधील विसंगती दूर करणे, सेवानिवृत्त कर्मचान्यांचे प्रलंबित देणी, रा. प. कामगारांना ७ वा वेतन आयोग लागू करणे मागणीसंदर्भात समिती स्थापन करून ६० दिवसात अहवाल सादर करणार

- शिस्त व अपिल कार्यपध्दती मध्ये सुधारणा करणे, अपहार प्रवण बदल्या रद्द करणे, कामगारांविरुध्द प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे मागे घेणे,

- चालक / वाहक / महिला कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणे, एसटी कर्मचान्यांना व त्यांच्या कुटूंबियांना सर्व प्रकारच्या एस.टी. बसेस मध्ये मोफत पासाची सवलत फरक न भरता लागू करणे

- सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांऐवजी एक वर्षाचा मोफत पास सर्वप्रकारच्या गाड्यांमध्ये उपलब्ध करुन देणे.

मुख्यमंत्र्यांनी एसटी कामगारांचा महागाई भत्ता स्वनिर्णय घेऊन ३४ टक्यात वाढ देऊन ३८ टक्के केलेले होते.परंतु राज्य शासनाच्या धर्तीवर पाहिजे म्हणून जो पूर्वीचा निर्णय झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ताबडतोप ४२ टक्के केलं.अग्रिम रक्कम, थकबाकी आणि इतर मागण्या सुद्धा लवकरच मार्ग लावण्यासाठी बैठकीत घेतल्या जाणार आहे.

- उदय सामंत, उद्योग मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com