गृहकलह शिगेला! न्यायाधीशांसमोर जबाब द्यायला डॉ. शोनाली, डॉ. अश्विन व डॉ. उमा वळसंगकर आले वेगवेगळ्या गाडीतून; साक्षीदार बदलू नयेत म्हणून पोलिसांकडून खबरदारी

सोमवारी दुपारी तीन ते पावणेचार या वेळेत डॉ. शिरीष वळसंगकर यांची पत्नी डॉ. उमा, मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. शोनाली या तिघांचे न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवून घेण्यात आले. त्यानंतर तिघेही तेथून बाहेर पडले. जाताना डॉ. अश्विन व डॉ. उमा हे लगेचच त्यांच्या त्यांच्या गाडीतून निघून गेले.
Solapur neurosurgeon Dr. Shirish Valsangkar’s suicide case
Solapur neurosurgeon Dr. Shirish Valsangkar’s suicide caseesakal
Updated on

सोलापूर : सोमवारी दुपारी तीन ते पावणेचार या वेळेत डॉ. शिरीष वळसंगकर यांची पत्नी डॉ. उमा, मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. शोनाली या तिघांचे न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवून घेण्यात आले. त्यानंतर तिघेही तेथून बाहेर पडले. जाताना डॉ. अश्विन व डॉ. उमा हे लगेचच त्यांच्या त्यांच्या गाडीतून निघून गेले. मात्र, डॉ. शोनाली काहीवेळ न्यायालयातच थांबून होत्या. तेथून त्या चालत न्यायालयाबाहेर आल्या आणि रोडलगत लावलेल्या त्यांच्या चारचाकी गाडीतून निघून गेल्या. विशेष बाब म्हणजे तिघेही एकमेकांना बोलले नाहीत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील कलम १८३ नुसार....

सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला ३२ दिवस पूर्ण झाले. पोलिस आता अटकेतील मनीषा मुसळे माने यांच्याविरुद्ध चार्टशिट दाखल करण्याच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोमवारी (ता. १९) डॉ. शिरीष यांची पत्नी डॉ. उमा, मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. शोनाली यांचे न्यायाधीशांसमोर जबाब नोंदविले. साक्षीदार पुन्हा बदलू नयेत म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील कलम १८३ नुसार असे जबाब नोंदवून घेतले जातात.

डॉ. वळसंगकर यांनी कौटुंबिक कलहातून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांसह सर्वांचाच अंदाज होता. पण, डॉक्टरांच्या सुसाईड नोटच्या आधारावर पोलिसांनी मनीषा यांना अटक केली. त्यानंतर तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी मनीषा यांची दोन टप्प्यात पाच दिवसांची कोठडी घेतली. त्यानंतर पोलिस कोठडीचे अधिकार राखून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी आणि पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी घेतली. आता पोलिसांनी मनीषा यांची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी घेतली आहे. पोलिस कोठडीचे अधिकार राखून ठेवलेले असताना देखील पाच दिवसांत पोलिसांनी मनीषाकडे तपास केलेला नाही.

२७ मे रोजी न्यायालयीन कोठडी संपणार असून तत्पूर्वी पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेल्या डॉ. उमा, डॉ. अश्विन व डॉ. शोनाली यांचे जबाब न्यायालयासमोर नोंदवून घेतले आहेत. खटल्याची सुनावणी सुरू झाल्यावर साक्षीदार बदलला तर या जबाबामुळे त्यांच्यावर करवाई होऊ शकते. त्यामुळे न्यायाधीशांसमोरील जबाब महत्त्वाचा मानला जातो.

जामिनावरील सुनावणी लांबणार; पोलिसांकडून चार्टशिटची तयारी

मनीषा यांच्या जामीन अर्जावर सरकार पक्षाकडून २१ तारखेला म्हणणे सादर होईल. पण, पोलिसांकडून जिल्हा सरकारी वकिलांना अद्याप कागदपत्रे दिली गेली नसल्याने सरकार पक्षाला म्हणणे सादर करण्यासाठी पुन्हा न्यायालयातून मुदतवाढ घ्यावी लागेल, अशी सद्य:स्थिती आहे. त्यामुळे जामिनावरील सुनावणी लांबण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत आल्यावरच जामिनावरील सुनावणी होत असते. आरोपी पोलिस कोठडी किंवा पोलिस कोठडीचे अधिकार राखून न्यायालयीन कोठडीत असेल तर जामिनावर सुनावणी होत नाही. त्यामुळे मनीषा यांना जामीन मिळण्यापूर्वीच पोलिस चार्टशिट दाखल करतील, अशी शक्यता देखील ज्येष्ठ वकिलांकडून वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com