Sanjay Raut: ''छत्रपतींचा अवमान करण्यासाठी केंद्राकडून बक्षिस?'' संजय राऊतांनी वाचला पाढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut on cm eknath shinde

Sanjay Raut: ''छत्रपतींचा अवमान करण्यासाठी केंद्राकडून बक्षीस?'' संजय राऊतांनी वाचला पाढा

मुंबईः आजपासून उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरु होत आहे. त्यापूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमचे ४० खोके गेलेले असले तरी शिवसेना जागेवरच आहे. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढला असून आता उद्धव ठाकरे दौरा करत असल्याचं राऊतांनी सांगितलं.

वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या होत असलेल्या अवमानाबद्दल संजय राऊत म्हणाले की, छत्रपतींचा अवमान करण्याची जणू स्पर्धाच लागलीय. या लोकांना आता 'करारा जवाब मिलेगा.' राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही काल छत्रपतींचा अवमान केला. परराज्यातून आणि परदेशातून ज्या छत्रपतींचा इतिहास बघण्यासाठी लोक येतात त्याच खात्याच्या मंत्र्यांना महाराजांचा इतिसाह माहिती नसणं दुर्दैवी आहे.

हे ही वाचा: भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

मुळात महाराजांची तुलना बेईमानाशी करणं चूक असल्याचं राऊत म्हणाले. मंगलप्रभात लोढा यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना शिवरायांशी केली होती, त्यावरुन संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा: Twitter: 'मस्का' लावणाऱ्या युजर्सना 'एलॉन'चं वेसण; तुमचे फॉलोअर्स ढासळणार

''सध्या महाराजांचा अपमान करण्याची जणू स्पर्धा सुरुय. छत्रपतींचा अपमान करण्यासाठी केंद्र आणि राज्याकडून बक्षिस ठेवण्यात आलंय का?'' असा प्रश्न उपस्थित करुन त्यांनी शिवरायांचा अवमान करणाऱ्या वक्तव्यांचा पाढाच वाचला.