Plastic Tea Cup: प्लास्टिकच्या कपाने चहा पित असाल तर सावधान, तुम्हाला होवू शकतो भयानक आजार

Latest Marathi News : कोरोनाच्या काळात संसर्ग टाळण्यासाठी अशा कपांचा केला जाणारा वापर आता वेळ,कष्ट,आणि पैशाच्या बचतीमुळे सऱ्हास हॉटेल,कॅफे मध्ये वाढला आहे.
सावधान :  प्लास्टिकच्या कपाने चहा पित असाल तर सावधान, तुम्हाला होवू शकतो भयानक आजार
Caution: If you drink tea from a plastic cup, be careful, you may get a terrible diseasesakal
Updated on

Yermala : १० दीपक बारकुल सध्या आपल्याला बाहेर खाण्या पिण्याची सवयी वाढल्या आहेत.तुम्ही चहा शौकीन असाल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे,तुम्ही पेपर अथवा प्लास्टिकच्या कपामधून पदार्थांचे सेवन केले, करत असाल तर लवकरच तुम्हाला कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो.एखाद्या कॅफे असो अथवा कोणताही चहाचा स्टॉल, टपरी अशा बऱ्याच ठिकाणी पेपर नाहीतर प्लास्टिक कपांचा वापर केला जातो.

कागदी,प्लास्टिक कपामध्ये द्रव पदार्थ पिणे सोपं असतं,त्यामुळे त्याचा दररोज मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.विशेषतः कोरोनाच्या काळात संसर्ग टाळण्यासाठी अशा कपांचा केला जाणारा वापर आता वेळ,कष्ट,आणि पैशाच्या बचतीमुळे सऱ्हास हॉटेल,कॅफे मध्ये वाढला आहे.

सावधान :  प्लास्टिकच्या कपाने चहा पित असाल तर सावधान, तुम्हाला होवू शकतो भयानक आजार
Jaggery Tea Craze : वेगळी चव म्हणून तरुणाईला लागली गुळाच्या चहाची ‘गोडी’

दैनंदिन सहज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का,अशा वस्तू वारंवार वापरणे सुरक्षित आहे का,प्लास्टिक अथवा पेपर कपमध्ये चहा प्यायल्याने आरोग्यावर कसा परिणाम होतो,ते जाणून घेऊया.

प्लॅस्टिकच्या, प्लास्टिक कोटिंग कागदी कपामध्ये चहा अथवा कोणतेही गरम पेय प्यायल्याने प्लास्टिकचे कण त्यात विरघळू लागतात.कांही प्लास्टिकचे कप बिस्फेनॉल ए (बिपीए)अथवा पॅथोलेट्स सारख्या हानिकारक रसायनांचा वापर करून तयार केले जातात,जे गरम पेयांमध्ये वितळतात आणि थेट शरीरात जातात.

बिस्फेनॉल ए (बिपीए) अथवा पॅथोलेट्स याचा शरीरात प्रवेश झाल्यास आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे शरीराच्या अनेक भागांवर विपरीत परिणाम दिसून येतात.

-------------

सावधान :  प्लास्टिकच्या कपाने चहा पित असाल तर सावधान, तुम्हाला होवू शकतो भयानक आजार
Tea Prices: आता चहा पिणेही होणार महाग? भारतीय चहा उद्योग संकटात, काय आहे कारण?

पेपर कपमध्ये चहा पिणं नुकसानकारकच

प्लास्टिकमुळे होणारी हानी टाळण्यासाठी बहुतेक लोक पेपर कप वापरतात.मात्र पेपर कप वापरणेही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.पेपर कप तयार करण्यासाठी,प्लास्टिक किंवा मेणाचे कोटिंग केले जाते पेपर कपमध्ये गरम पेय,पदार्थ टाकल्यास त्यामध्ये रसायने मिसळू शकतात.त्यामुळे याच्या सेवनाने हे विषारी पदार्थ थेट शरीरात जाऊ शकतात.

सुरक्षित पर्याय कसा निवडावा

प्लास्टिकपासून होणारा धोका कमी करण्यासाठी,बीपीए

मुक्त आणि पॉलीप्रॉपिलीन अथवा पॉलिथिलीन सारख्या सामग्रीपासून बनवलेले कप वापरणे अधिक सुरक्षित असू शकते.यासोबतच,गरम वस्तूंच्या सेवनासाठी फूड ग्रेड अंतर्गत बनवलेले पेपर कप वापरणे अधिक सुरक्षित मानले जात असले तरी ग्रामीण भागात अशा वस्तूंची प्रतपडताळणी अवघड आहे.नफेखोरी मुळे त्याप्रतीचे उत्पादन होत नाही तेव्हा अशा प्रकारच्या वस्तूचा वापर टाळणे अशा वस्तू न स्वीकारनेच बचावाचा पर्याय ठरू शकतो.

धोका पत्करण्याची सवय झाली आहे.

आज पर्यंत सोशलमीडियाच्या माध्यमातून यामुळे होणाऱ्या दुष्परिणामातून कॅन्सर सारखे धुर्दर आजर होत असल्याचे अनेक व्हिडीओ,पोष्ट पहिल्या असुन आपण धोका पत्करतो, एक कप चहातून पंचवीस हजार मायग्रेन प्लास्टिक आपल्या पोटात जाते रोज चार कप म्हटले तरी एकलाख मायग्रेन दररोज पोटात जाणारे प्लास्टिक येणाऱ्या सहामहिन्यात तुम्हाला आजारी पडण्यास कारणीभूत ठरू शकते.सध्या अशा रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

सावधान :  प्लास्टिकच्या कपाने चहा पित असाल तर सावधान, तुम्हाला होवू शकतो भयानक आजार
Green Tea Benefits : 'ग्रीन टी'चं कधी सेवन करावं आणि कधी करू नये? जाणून घ्या..

बाजारपेठेत कॅरीबॅग वापरावर बंदी आहे,त्या प्रमाणे इतर प्लास्टिक अथवा प्लास्टिक कोटेड कागदी कपावर स्थानिक स्वराज्य संस्थे अंतर्गत महानगर पालिका,नगर पालिका,नगर पंचायत,ग्रामपंचायत प्लास्टिक वापरावर बंदी असल्याने कारवाई करु शकते.

याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था कॅरीबॅग विरुद्ध कायदेशीर दांडात्मत कारवाई करते त्या प्रमाणे प्लास्टिक कोटिंग कागदी कपा संदर्भातही कारवाई करत असुन असे साहित्य हॉटेल धारकांना विकण्याऱ्या व्यापाऱ्यांना, दुकानदारांना उपलब्ध शिल्लक माला नंतर विक्री न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राव साहेब चकोर. गट विकास अधिकारी पंचायत समिती कळंब.

दैनंदिन वापरातील प्लास्टिक कोटिंग वस्तुमुळे अनेक दुर्धर आजारासह फुफ्फुसाचे,पोटाचे कँसर होऊ शकतात शिवाय प्लास्टिक,प्लास्टिक कोटिंग वस्तु वापरातील असो अथवा टाकाऊ त्या असंख्य संसर्गाच्या रोगाचे प्रसार माध्यम आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी घालावी.

डॉ.इस्माईल मुल्ला, जिल्हा शल्य चिकित्सक,धाराशिव.

सावधान :  प्लास्टिकच्या कपाने चहा पित असाल तर सावधान, तुम्हाला होवू शकतो भयानक आजार
Monsoon Diseases : पावसाळ्यात वाढतो 'या' आजारांचा धोका; स्वतःचा बचाव कसा कराल? जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.