
कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना स्पष्ट निर्देश
मुंबई : राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका, असे स्पष्ट निर्देष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यामुळं पोलिसांना कारवाईसाठी आता कुठल्याही प्रकारचा दबाव नसेल हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळं येत्या काळात महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि पोलीस यांच्यातील संघर्ष अधिक तीव्रतेनं पहायला मिळू शकतो. (Dont wait for anyones order CM Uddhav Thackeray clear instructions to police)
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर आज गृहमंत्रालयाची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेचा तपशील आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रालयाला सांगितलं की, "कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी पोलिसांनी घ्यावी, यासाठी कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नये"
हेही वाचा: ...अशी कारवाई करणारा पहिला हिंदू असेल, हे आमचं दुर्दैव; राणेंचं पवारांवर टिकास्त्र
दरम्यान, मुख्यमंत्री आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांचीही फोनवरुन राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा झाली. दरम्यान, मुंबईत कायदा-सुव्यस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
Web Title: Dont Wait For Anyones Order Cm Uddhav Thackeray Clear Instructions To Police
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..