साप चालवल्यावर गावठी इलाज नकोच! शरीरात विष पसरू नये म्हणून ‘हे’ उपाय करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

snake
साप चालवल्यावर गावठी इलाज नकोच! शरीरात विष पसरू नये म्हणून ‘हे’ उपाय करा

साप चालवल्यावर गावठी इलाज नकोच! शरीरात विष पसरू नये म्हणून ‘हे’ उपाय करा

सोलापूर : साप चालवल्यानंतर घरी थांबून गावठी उपचार करण्यापेक्षा रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात दाखल करणे जरूरी आहे. हॉस्पिटलमध्ये जायला झालेला विलंब रुग्णाच्या जीवावर बेतू शकतो. पावसाळ्यात गवतात वाढ झाल्याने सापाचे प्रमाण वाढलेले असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात दोन प्रकारचे साप मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यात कोब्रा आणि घोणस हे दोन साप आहेत. ते दोन्ही साप विषारी असून कोब्रा साप चावल्यावर रुग्ण नर्व्हस सिस्टिमला जातो आणि काहीवेळात बेशुध्द होतो. तर घोणस चावल्यावर रुग्णाच्या रक्तपुरवठा थांबण्याचा धोका असतो. दोन्ही साप चावलेले रुग्ण दगावण्याची शक्यता दाट राहते. त्यामुळे गावठी उपचार करण्यात वेळ वाया न घालवता तातडीने त्या रुग्णाला दवाखान्यात दाखल करायला हवे. जेणेकरून रुग्ण दगावणार नाही. सध्या पावसाळा सुरु असून शेतात, घराजवळ गवत वाढल्याने सापांचा वावर त्यात वाढला आहे. साप चावल्यावर किडनी, फुफ्फुसाला सुज येते. त्यामुळे अनेकदा रुग्णाला डायलेसिसदेखील करावे लागते. दरम्यान, उपचारास विलंब झाल्यास सापाचे विष संपूर्ण शरीरात पसरते आणि मज्जासंस्थेवर त्याचा परिणाम होऊन रुग्ण दगावण्याची शक्यता बळावते. काही दिवसांपूर्वी अक्कलकोट तालुक्यातील एका चिमुकल्याला झोपेत असतानाच साप चावला होता. पण, त्याच्या कुटुंबियांना त्याची माहिती मिळाली तोवर खूपच विलंब झाला होता. शेवटी त्या चिमुकल्याचा जीव गेला. त्यामुळे नागरिकांनी सर्पदंश होणार नाही, यादृष्टीने खबरदारी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

  • सर्पदंशानंतर ‘हे’ उपाय करा
    १) सर्पदंशाची जागा स्वच्छ पाण्याने धुवा; घाबरून जावू नका
    २) पायाला सर्पदंश झाल्यास मांडीला किंवा हाताला संर्पदंश झाल्यास दंडाला घट्ट दोरीने बांधा
    ३) रुग्णाला तातडीने (अर्ध्यातासात) दवाखान्यात दाखल करा

सर्पदंश झाल्यानंतर वेळ न घालवता संबंधित रुग्णाला तातडीने दवाखान्यात दाखल करा. गावठी उपचारातून रुग्ण बरा होईल, अशी अपेक्षा कोणीही ठेवू नये. सिव्हिल हॉस्पिलटमध्ये सर्पदंशावर चांगले उपचार मिळतात.
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर

Web Title: Dont Want Village Treatment After Running A Snake Take These Measures To Prevent The Spread Of Poison In The

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..