Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koyna Dam

जलाशयात प्रति सेकंद 8573 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे.

Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पाटण (सातारा) : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर (Heavy Rain) वाढला आहे. गेल्या 24 तासांत कोयनानगर इथं 116 मिलिमीटर, नवजाला 142 मिलिमीटर आणि महाबळेश्वरला (Mahabaleshwar) 122 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय.

धरणाचा एकूण पाणीसाठा 101.57 टीएमसी झाला असून जलाशयात प्रति सेकंद 8573 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी असून पडत असलेला पाऊस आणि धरणात होणारी पाण्याची आवक याचा विचार करून धरण व्यवस्थापनानं आज दुपारी दोन वाजता दुसऱ्या वेळी धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचलून पाणी नदीपात्रात सोडण्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा: Nitish Kumar : दमण-दीवमध्ये नितीश कुमारांना मोठा झटका; 'जेडीयू'ची संपूर्ण युनिट भाजपमध्ये विलीन

दरवाजे दीड फुटाने उचलले तर सहा वक्र दरवाज्यातून 12891 क्यूसेक आणि पायथा वीज गृहातून १०५० क्यूसेक्स असा एकूण 13941 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात येणार आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: Supreme Court चा मोठा निर्णय; 3 उच्च न्यायालयांमध्ये 20 न्यायाधीशांच्या नियुक्तीला मंजुरी

Web Title: Door Of Koyna Dam Will Be Reopened Dam Management Committee

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..