मुंबई - आदिवासी वसतिगृहातील ५८ हजार ७०० विद्यार्थ्यांच्या निर्वाह, आहार आणि शैक्षणिक साहित्य खरेदीच्या भत्त्यात जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला.
ही वाढ ४० ते १०० टक्क्यांपर्यंत करण्यात आल्याने राज्य सरकारवर अतिरिक्त ८३ कोटी ६६ लाखांचा बोजा पडणार आहे. आदिवासी विभाग यासाठी १४४ कोटी ७४ लाख खर्च करत होते. यापुढे यासाठी २२८ कोटी ४१ लाख खर्च होणार आहेत.