'डॉ. आंबेडकर पुतळा ३५० फूट उंच'

सकाळ न्यूज नेटवर्क 
गुरुवार, 16 जानेवारी 2020

इंदू मिल येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकामधील पुतळ्याची उंची ३५० फूट इतकी करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.

मुंबई - इंदू मिल येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकामधील पुतळ्याची उंची ३५० फूट इतकी करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. यापूर्वी या पुतळ्याची उंची २५० फूट इतकी निश्‍चित करण्यात आली होती. आजच्या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा १०० फूट व पुतळा ३५० फूट अशी स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून ४५० फूट इतकी होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्मारकासाठी यापूर्वी राज्य सरकारने ७५० कोटींची मान्यता दिली होती, मंत्रिमंडळाने आता या वाढीव एक हजार ६९ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. २०१५ मध्ये या स्मारकाच्या भूमिपूजनाचे काम करण्यात आले होते, मात्र अद्याप तिथे कोणतेही काम झालेले नसल्याची टिप्पणी अजित पवार यांनी केली. मात्र केंद्र सरकारकडून आवश्‍यक असणाऱ्या सर्व परवानग्या प्राप्त झालेल्या असून, राज्य सरकारच्या काही विभागांकडून आवश्‍यक असणाऱ्या परवानग्या येत्या आठ दिवसांतच दिल्या जातील, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

पुतळ्याची वैशिष्ट्ये...
    उंची वाढल्याने ब्राँझचे व लोखंडाचे प्रमाण वाढेल
    पुतळ्याच्या पायाचीदेखील वाढ होईल
    स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरविण्याची सोय 
    पादपीठामध्ये ६.० मीटर रुंदीचे चक्राकार मार्ग
    खुल्या हरित जागेत ४०० लोकांची आसनक्षमतेचे ध्यानगृह असेल.
    एक हजार आसनक्षमतेचे अत्याधुनिक प्रेक्षागृह

पुतळ्याच्या जागेसाठी आवश्‍यक वृक्षच तोडले जातील, मात्र सध्या असलेले कोणतेही वृक्ष तोडायचे नाहीत. आवश्‍यक झाडे लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Ambedkar statue 350 feet high