Dr Kumar Saptarshi Passes Away at 85
esakal
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे (युक्रांद) संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन झालं आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी सप्तर्षी यांची प्राणज्योत मालवली. वृद्धापकाळासह मधुमेहाच्या त्रासामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुण्यातील एरंडवणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.