डॉ. सुजय विखे पाटील यांचा अखेर सोमवारी मुंबईत भाजप प्रवेशर

Dr Sujay Vikhe Patil finally will enter in BJP Mumbai on Monday
Dr Sujay Vikhe Patil finally will enter in BJP Mumbai on Monday

नगर : ज्येष्ठ काँग्रेसनेते व विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पूत्र डॉ. सुजय विखे पाटील यांच्या बहुचर्चित भाजप प्रवेशावर आज अखेर शिक्कामोर्तब झाले. सोमवारी (ता. 11) मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे उपाध्यक्षपद व पक्षाची नगर लोकसभा मतदारसंघातील  उमेदवारी डॉ. सुजय यांना बहाल करण्यात येणार आहे.

आजोबा दिवंगत माजी केंद्रीयमंत्री बाळासाहेब विखे पाटील, वडील राधाकृष्ण
विखे पाटील व जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असलेल्या आई शालिनी विखे पाटील 
या तिघांच्याही तगड्या रेडीमेड नेटवर्कचा मोठ्या खुबीने उपयोग करुन घेत 
सुजय यांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून नगर लोकसभा मतदार संघातून 
खासदारकीची जोरदार तयारी चालविली आहे. आघाडीच्या वाटपात राष्ट्रवादीच्या
वाट्याला असलेली नगरची जागा काँग्रेसला मिळेल, असे गृहीत धरुन त्यांनी 
मोर्चेबांधणी चालविली होती. तथापि, राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह घेवून निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक व  राज्यपातळीवरील काही मोजक्‍या नेत्यांनीही पक्षाने सुजय यांना उमेदवारी द्यावी, अशी गळ श्रेष्ठींना घातली. परंतु श्रेष्ठींनी सुजय यांना उमेदवारी देण्यास अनुकूलता दाखविली नाही. त्यामुळे संतापलेल्या डॉ. सुजय यांनी  शुक्रवारी (ता. 8) मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेवून मी
 आता तुमच्या पक्षाची उमेदवारी करणार नसल्याचे स्पष्ट केले. 

कदम यांचा राजीनामा सुजयसाठीच?

दरम्यान, नगर लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसला सुटत नाही व राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारीही आपल्याला मिळत नाही, असे स्पष्ट झाल्यानंतर सुजय  यांनी भाजपमध्ये जाण्याची "लाईन' टाकली. गेले काही दिवस  मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून भाजपच्या श्रेष्ठींशी चर्चा करण्याचे काम सुजय यांनी चालूच ठेवले होते. सुजय यांच्या भाजपच्या गोटात सामील होण्याची खात्री होताच शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी
आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपले वय 70 झाल्याने आपण राजीनामा देत
असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तथापि, सुजय यांना हे पद देण्याचे नाटत असल्यानेच कदम यांनी राजीनामा 
दिल्याचे सांगण्यात येते. 

अखेर "त्यांची' मैत्री आली कामाला!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे नुकतेच नगरला आले होते. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी विखे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत छेडले असता,  त्यांनी विखे भाजपच्या संपर्कात नसल्याचे सांगितले होते. परंतु, विखे  यांनी मात्र थेट मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातूनच लाईन टाकल्याने पक्षाच्या इतर नेते व पदाधिकाऱ्यांना त्याचा मागमूसही लागला नाही. राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्र्यांशी आपली मैत्री असल्याचे जाहीर  कार्यक्रमांमधून सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्याला दुजोरा दिला
होता. सुजय यांना भाजपशी घरोबा करताना वडील व मुख्यमंत्र्यांची ही 
बहुचर्चित मैत्री कामी आल्याचे बोलले जाते. 

वीस दिवसांपासून चालू होती फील्डिंग

कॉंग्रेसच्या अनुराधा नागवडे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेश करुन त्यांना नगरची उमेदवारी देण्याचे धोरण राष्ट्रवादीने स्वीकारले तेव्हापासूनच सुजय यांनी भाजपमध्ये फील्डिंग लावली होती. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह दिल्लीतील हायकमांडशी चर्चा केली. शुक्रवारी (ता. 8) मुंबईत मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी चर्चेस गेलेले सुजय  वाहिन्यांच्या माध्यमातून सर्वांना दिसले. परंतु, गेल्या वीस दिवसात तब्बल
चार वेळा 'वर्षा'वर चर्चा करुनही त्याचा मागमूसही कोणाला लागला नाही.
शुक्रवारी (ता. 8) मंत्री महाजन यांच्याशी चर्चेनंतर प्रवेशाचा अंतिम  निर्णय झाला. त्यानंतर महाजन लागलीच आज नगरला आले. त्यांनी खासदार दिलीप  गांधी यांच्यासह भाजपच्या आमदारांशी चर्चा केली. जाताना सुजय यांना आपल्या हेलिकॉप्टर मध्ये मुंबईला नेले. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर सुजय यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाल्याचे स्पष्ट झाले. 

राधाकृष्ण यांचे विरोधी पक्षनेतेपदही कायम?

पूत्र सुजय भाजपवासी झाल्याने आता मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतील राधाकृष्ण विखे पाटील यांची कॉंग्रेसमध्ये मोठी अडचण होणार आहे. त्यामुळेते भाजपमध्ये येवून मंत्रीपदाची शपथ घेतील की कॉंग्रेसमध्येच राहतील, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. कॉंग्रेसमध्ये राहिल्यास विखे यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुत्रासोबतच विखे हेही "जय श्रीराम' चा नारा देवून नगर जिल्ह्यातील दोन्ही खासदार व बारापैकी किमान दहा आमदार निवडून आणण्यासाठी ताकद पणाला लावतील, असेही बोलले जाते. तथापि, कॉंग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्यानुसार राधाकृष्ण विखे पाटील हे कॉंग्रेसमध्येच राहतील व त्यांचे विरोधी पक्षनेतेपदही कायम असेल. अर्थात आज त्यांनी दिल्लीतील कॉंग्रेस
हायकमांडच्या भेटी घेत माझा मुलगा ऐकत नाही. तो भाजपमध्ये जात आहे, परंतु 
मी मात्र कॉंग्रेसमध्येच आहे, असे स्पष्ट केल्याचे सांगण्यात येते.

माझी लोकसभेची उमेदवारी सामान्य जनतेच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी
आहे. त्यासाठी मी घेतलेला कोणताही राजकीय निर्णय हा माझा स्वतःचा असेल. 
त्याच्याशी माझ्या आई-वडील व घरच्या मंडळींचा काहीच संबंध नसेल, असे मी
वारंवार जाहीरपणे सांगितले आहे. तीच भूमिका माझी आजही कायम आहे.

- डॉ. सुजय विखे पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com