Dr. Tatyarao Lahane : डॉ. तात्याराव लाहनेंचा राजीनामा अखेर सरकारकडून मंजूर; नवीन नियुक्तीसाठी दिले आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dr tatyarao lahane

Dr. Tatyarao Lahane : डॉ. तात्याराव लाहनेंचा राजीनामा अखेर सरकारकडून मंजूर; नवीन नियुक्तीसाठी दिले आदेश

डॉ. तात्याराव लाहनेंचा राजीनामा सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. डॉ. लहाने यांच्या जागी नवीन व्यक्तीची नियुक्ती करण्याच्या आदेश देण्यात आले आहेत. जे. जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या तक्रारीनंतर त्यांनी राजीनामा दिला होता.

मुंबईतील प्रसिद्ध जेजे रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे वरिष्ठ प्रमुख डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ रागिणी पारेख यांनी ९ डॉक्टरांसमवेत राजीनामा दिला होता तो आता स्वीकारण्यात आला आहे. 

मार्डच्या निवासी डॉक्टरांनी या वरिष्ठ डॉक्टरांविरोधात नियमभंगाची तक्रार केली होती. या तक्रारीविरोधात चौकशी करत नेत्ररोग चिकत्साविभागानं यावर स्पष्टीकरण दिलं होत. पण यानेही समाधान झालं नसल्यानं मार्डनं संपाचं हत्यार उगारलं. त्यामुळं उद्वीग्न होऊन लहाने, पारेख यांच्यासह ९ डॉक्टरांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले.

राजीनामा मंजूर झाल्यानंतर लहानेंची पहिली प्रतिक्रिया

निवासी डॉक्टरांच्या आरोपानंतर डॉ.लहाने यांनी राजीनामा दिला होता. तसेच त्यांच्या बदलीची मागणी देखील करण्यात आली होती. यानंतर एबीपी माझाशी बोलताना लहाने म्हणाले की. मी ३१ मे रोजा राजीनामा दिला होता. कारण आमच्यावर जे आरोप करण्यात आले त्यावर आमचं मत न घेता अहवाल सादर करण्यात आला होता.

निवासी डॉक्टरांनी खोटे आरोप केल्यानंतर व्यथीत होऊन आठ जणांनी राजीनामा आणि एक जणांने व्हीआरएस दिली होती. त्यानंतर आम्ही राजीनामा स्वीकारण्याची विनंती सरकारकडे केली होती. त्यामुळे आता राजीनामा मंजूर केल्याबद्दल मी सरकारचे मनापासून आभार मानतो, असे तात्याराव लहाने म्हणाले.