घर कामगार आणि वाहन चालकांना सोसायटीमध्ये प्रवेश नाकाराल तर गोत्यात याल, कारण...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण संकुलाच्या आवारात घर कामगार तसेच वाहन चालकांना बंदी घालता येणार नाही.

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण संकुलाच्या आवारात घर कामगार तसेच वाहन चालकांना बंदी घालता येणार नाही. राज्य शासनाने याबाबतचे स्पष्ट निर्देश सहकारी संस्थांंचे सहकार आयुक्त व निबंधक यांना परिपत्रकाद्वारे दिले आहेत. निर्देशांचं पालन न करणाऱ्या संकुलावर कायदेशीर कारवाईचे आदेश देखील दिले आहेत.

लहान मुलांना सांभाळा... मुलं होताहेत कोरोनाची शिकार! धक्कादायक माहिती आली समोर

कोविड19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनांमध्ये घर कामगार व वाहन चालक यांना गृहनिर्माण संस्थेच्या आवारात कामकाजा करिता प्रवेश प्रतीबंधीत केलेला नाही असे सरकारने आज स्पष्ट केले. तथापी काही सहकारी गृहनिर्माण संस्था त्यांना प्रवेश प्रतिबंधित करत असून त्याअनुषंगाने सहकारी गृहनिर्माण संस्थानचे पदाधिकारी संस्थेच्या स्तरावर शासनाच्या निर्देशाच्या विपरीत नियमावली तयार करत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. 

लॉकडाऊननंतर काहीशी अशी दिसतील मुंबईतील भाजी मार्केट

घर कामगार व वाहन चालक यांना गृहनिर्माण संस्थांमध्ये कामकाजासाठी प्रवेश देण्यासंदर्भात सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.तसेच या सुचनांच्या विपरीत गृहनिर्माण संस्थांनी नियम तयार करू नयेत असे निर्देश ही दिले आहेत.ही बाब राज्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थानच्या निदर्शनास आणून द्यावी असे ही राज्य शासनाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.

drivers and maids are allowed to enter housing societies says government 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drivers and maids are allowed to enter housing societies says government