पुणे - राज्यात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता नववी आणि दहावीत प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास १२.६ टक्के विद्यार्थी आणि १०.३ टक्के विद्यार्थिंनींनी शिक्षण अर्धवट सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात सरासरी एकूण ११.५ टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२३-२४ च्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या गळतीत एका टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.