1972 पेक्षा सध्याची दुष्काळी परिस्थिती गंभीर : पवार

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मे 2019

- राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी मागितली मुख्यमंत्री फडणवीस यांची वेळ.

मुंबई : राज्यातील काही दुष्काळी भागांची पाहणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. सोलापूर, सातारा, अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात 1972 पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. 

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील टप्पा संपतल्यानंतर शरद पवार यांनी सोलापूर, सातारा, अहमदनगर आणि बीड या दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा केला आणि या दरम्यान शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच चारा छावण्यांतील शेतकऱ्यांच्या, मालकांच्या अडचणीही समजून घेतल्या. शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी यावर कोणत्या उपाययोजना करायला हव्यात यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून लक्ष घालावे आणि संपूर्ण दुष्काळी भागासाठी आवश्यक ते निर्णय घ्यावेत, अशी मागणी शरद पवार यांनी पत्राद्वारे केली.

दरम्यान, राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वेळही मागितली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drought situation worse than 1972 says Sharad Pawar