DSK: साध्या वॉचमनच्या पोटी जन्मलेल्या 'डीएसके' यांनी शून्यातून साम्राज्य उभं केलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

DSK

DSK: साध्या वॉचमनच्या पोटी जन्मलेल्या 'डीएसके' यांनी शून्यातून साम्राज्य उभं केलं

DSK

DSK

'डीएसके म्हणजे घराला घरपण देणारी माणसं'. अगदी सामान्य घरातून पुढे आलेले बिल्डर म्हणून डी. एस. के म्हणजेच दीपक सखाराम कुलकर्णी यांची ओळख करून दिली जायची. सामान्य घरातून पुढे येऊन त्यांनी बऱ्याच गोष्टी करून दाखवल्या.घरातील फोन स्वच्छ करुन त्यावर सुगंधी पट्टी लावून फोनमधून सुगंध निर्माण करणारी माणसं अशी टेलिस्मेल नावाची कंपनी त्यांनी सुरवातीला काढली होती. ही टेलिस्मेल नावाची कंपनी बऱ्यापैकी नावारूपालाही आली. त्यानंतर मिळेल ते काम करणं डी. एस. कुलकर्णी यांनी सुरु केलं.

DSK

DSK

घरातील फोन स्वच्छ करुन त्यावर सुगंधी पट्टी लावून फोनमधून सुगंध निर्माण करणारी माणसं अशी टेलिस्मेल नावाची कंपनी त्यांनी सुरवातीला काढली होती. ही टेलिस्मेल नावाची कंपनी बऱ्यापैकी नावारूपालाही आली. त्यानंतर मिळेल ते काम करणं डी. एस. कुलकर्णी यांनी सुरु केलं.

DSK

DSK

त्यानंतर १९८० सालच्या दरम्यान रास्ता पेठेतील एक जुना जळका वाडा त्यांनी विकत घेतला. या वाड्याला लोक भूताचा वाडा असंही म्हणत. जुना पडका वाडा विकत घेवून त्यांवर अश्विनी टॉवर्सची निर्मीती करत डी.एस. कुलकर्णी यांनी डी. एस. कुलकर्णी अॅण्ड कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर काही काळातच पुण्यातील एक विश्वासू बिल्डर म्हणून ओळख त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांनाही लगेचच डी.एस.के यांनी कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टला हात लावला नाही.

DSK

DSK

काही वर्षांनंतर डी.एस.के यांनी कोथरुडमध्ये चंद्रलोकनगरी उभी केली. त्यानंतर वेगवेगळे प्रोजेक्ट चालू झाले याच काळात त्यांची नजर पुण्याच्या दूरवर असणाऱ्या डोंगररांगावर गेली. सिंहगडाच्या पायथ्याला असणाऱ्या टेकडावर नवीन प्रोजेक्ट सुरु केला आणि डी. एस. के.च्या विश्वचा पाया रोवला.धायरीतून पुढे या भागात त्या वेळी कोणतीही डेव्हलपमेंट झालेली नव्हती. हा संपुर्ण भाग हिरवागार होता.

जागेचा भावही कमी असल्याने इथे विश्व निर्माण करुन मध्यमवर्गीयांना परवडणारी चांगल्या श्रेणीतील घरे बांधता येतील अशी योजना त्यांच्या मनात आली. पुण्यातून धायरीत इतक्या दूरवर लोक रहायला येणार नाहीत असे सर्वांचे मत होते. त्याचबरोबर धायरीच्या जवळ बाजार, दवाखाना, शाळा अशा अनेक समस्या त्याठिकाणी होत्या. तेव्हा धायरीतच सर्व गोष्टी उभा करायच्या अशी संकल्पना त्यांनी मांडली होती. याच काळात त्यांची खूप फ्लॅट विकले गेले.

DSK

DSK

धायरीतून पुढे या भागात त्या वेळी कोणतीही डेव्हलपमेंट झालेली नव्हती. हा संपुर्ण भाग हिरवागार होता. जागेचा भावही कमी असल्याने इथे विश्व निर्माण करुन मध्यमवर्गीयांना परवडणारी चांगल्या श्रेणीतील घरे बांधता येतील अशी योजना त्यांच्या मनात आली.

पुण्यातून धायरीत इतक्या दूरवर लोक रहायला येणार नाहीत असे सर्वांचे मत होते. त्याचबरोबर धायरीच्या जवळ बाजार, दवाखाना, शाळा अशा अनेक समस्या त्याठिकाणी होत्या. तेव्हा धायरीतच सर्व गोष्टी उभा करायच्या अशी संकल्पना त्यांनी मांडली होती. याच काळात त्यांची खूप फ्लॅट विकले गेले.त्याचबरोबर सामांन्यांना कमी किमतीत घर आणि इतर सोयीसुविधांची त्यांनी उपलब्ध करून दिल्या. त्याचबरोबर घर विकत घेणाऱ्या सामान्यांना बक्षीसही देऊ केले.त्याचबरोबर त्यांच्या प्रामाणिकपणाचे किस्सेही सांगितले जातात.

DSK

DSK

त्याचबरोबर सामांन्यांना कमी किमतीत घर आणि इतर सोयीसुविधांची त्यांनी उपलब्ध करून दिल्या. त्याचबरोबर घर विकत घेणाऱ्या सामान्यांना बक्षीसही देऊ केले.त्याचबरोबर त्यांच्या प्रामाणिकपणाचे किस्सेही सांगितले जातात.