DSK News | पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

d s kulkarni granted bail by pune court in mofa case

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन

पुणे : शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यावयसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. कुलकर्णी यांना मोफा प्रकरणात पुणे न्यायालयाने जामीन मंजूर झाला असून कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने फ्लॅट विकत घेणाऱ्याकडून आगाऊ रक्कम घेतली आणि फ्लॅटचा ताबा त्या खरेदीदारांना दिलाच नाही असे आरोप त्यांच्यावर आहेत. त्यांना मार्च २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. (d s kulkarni granted bail by pune court in mofa case )

दरम्यान सदनिका विकत घेतलेल्या नागरिकांकडून आगाऊ रक्कम घेऊन फ्लॅटचा ताबा दिला नाही म्हणून दाखल असलेल्या गुन्ह्यात बांधकाम व्यवसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. सत्र न्यायाधीश एस.के. डुगावकर यांनी हा आदेश दिला. याबाबत सिंहगड पोलिस ठाण्यात मोफा ( Maharashtra Owenershio Flat Act) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हेही वाचा: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन कोरोना पॉझिटिव्ह

डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांनी फ्लॅट खरेदीदारांकडून आगाऊ रक्कम घेतली आणि फ्लॅटचा ताबा देण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला. या गुन्ह्याच्या संदर्भात डीएसके यांना 5 मार्च 2019 रोजी अटक करण्यात आली होती. मात्र ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या मुख्य गुन्ह्यात डीएसके आणि इतर आरोपी 17 फेब्रुवारी 2018 पासून तुरुंगात आहेत.

या गुन्ह्यात जामीन मिळावा म्हणून डीएसके यांचे वकील आशुतोष श्रीवास्तव आणि ऍड. रितेश येवलेकर यांनी अर्ज केला होता. मुख्य गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी देखील डीएसके यांनी अर्ज केलेला आहे. हा अर्ज सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर 26 जुलै रोजी सुनावणी होणे अपेक्षित आहे

हेही वाचा: राष्ट्रवादीला मोठा धक्का! ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त

Web Title: D S Kulkarni Granted Bail By Pune Court In Mofa Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsDSK