पोलिसांच्या दक्षतेमुळे एक्‍स्प्रेसवरील लुटमार टळली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जून 2019

गाडीतील प्रवाशांची लूटमार करण्याच्या उद्देशाने आलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्‍याला रेल्वे पोलिसांनी पिटाळून लावले. 

केत्तूर (जि. सोलापूर) : मुंबईहून कन्याकुमारीकडे जाणारी कन्याकुमारी एक्‍स्प्रेस रेल्वे शुक्रवारी (ता. 14) रात्री अकराच्या सुमारास पारेवाडी रेल्वे स्थानकावर (ता. करमाळा) क्रॉसिंगसाठी थांबली असता, गाडीतील प्रवाशांची लूटमार करण्याच्या उद्देशाने आलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्‍याला रेल्वे पोलिसांनी पिटाळून लावले. 

कन्याकुमारी एक्‍स्प्रेस पारेवाडी स्थानकावर थांबविण्यात आली होती. या वेळी अंधारात दबा धरून बसलेली 10 ते 15 जणांची टोळी गाडीच्या दिशेने येत असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाचे नाना वीर; तसेच उमेश राऊत या गस्ती घालणाऱ्या पोलिसांना दिसले. त्यांनी अंधाराच्या दिशेने बॅटरीचा प्रकाश टाकताच, ही टोळी पसार झाली. याबद्दल प्रवाशांनी पोलिसांचे कौतुक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the efficiency of police the loot have Been failed