Duplicate Narendra Modi : 'हे खरं बोलणारे मोदी'; थोरातांनी घेतली 'त्या' मोदींनी भेट, विधीमंडळात चर्चांना उधाण

Narendra Modi
Narendra ModiSakal

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे विकास महंत यांनी विधानभवनात बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी महंत यांनी बाळासाहेब थोरात यांच्यासोबत फोटो काढले असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवशेन सुरू आहे. तर अनेक कार्यकर्ते नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी मुंबईला येत असतात. हुबेहूब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे दिसणारे विकास महंत हे सुद्धा विधीमंडळात आले असता त्यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली.

Narendra Modi
पुरामुळे मायलेकरांची तब्बल 35 वर्षानंतर झाली भेट; 2 वर्षाचा असताना झाली होती ताटातूट | Mother and Son

दरम्यान, विधीमंडळात आल्यानंतर महंत हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. यावेळी थोरात यांनी त्यांच्यासोबत फोटो काढले. त्याचबरोबर "या मोदींनी खोटं बोलता येत नाही, हे खरे बोलणारे मोदी आहेत" असे उद्गारही थोरातांनी काढले. त्यांच्या या वक्तव्यानंतर चांगलाच हशा पिकल्याचं समोर आलं आहे. तर त्यांच्या भेटीमुळे चर्चा सुरू झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com