esakal | मोठी कारवाई! अनिल देशमुखांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती ED कडून जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh

मोठी कारवाई! अनिल देशमुखांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती ED कडून जप्त

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. दिवसेंदिवस अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढच होताना दिसून येत आहे. अनिल देशमुखांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केली गेली आहे. यासंदर्भातील माहिती ईडीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे. याआधी ईडीनं अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापे टाकले होते. तसेच त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. या जप्त संपत्तीमध्ये अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची संपत्ती समाविष्ट आहे.

ईडीने बजावलेल्या समन्समध्ये त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला देखील चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आता त्यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई समोर आली आहे. गैरव्यवहार आणि भष्टाचार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई आणि नागपूरमधील ही मालमत्ता असल्याची माहिती मिळत आहे. या जप्त केलेल्या संपत्तीमध्ये वरळीमधील 1.54 कोटींचा फ्लॅट आणि रायगड जिल्ह्यातील उरणमधील धुतुम गावात 2.67 कोटी रुपयांची संपत्ती यांचा समावेश आहे.

हेही वाचा: लहान मुलांवरील कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी लवकरच पूर्ण होईल, केंद्राची हायकोर्टात माहिती

loading image