ED च्या गर्तेत अडकलेल्या सरनाईकांकडून तुळजाभवानीला ७५ तोळं सोनं अर्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pratap Sarnaik

Pratap Sarnaik: ईडीच्या गर्तेत अडकलेल्या सरनाईकांकडून तुळजाभवानीला ७५ तोळं सोनं अर्पण

शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक सध्या ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. अशातच सरनाईक यांनी तुळजाभवानी देवीला ७५ तोळ सोनं अर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. (ED Pratap Sarnaik offered 750 gram of gold to Tulja Bhavani Devi )

दोन आठवड्यापूर्वी, प्रताप सरनाईकांची संपत्ती जप्त करण्यासाठी ईडीने हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी ईडीने परवानगी मिळविली असून सरनाईकांची पहिल्या टप्प्यात ११ कोटींची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. अशातच तुळजाभवानीला ७५ तोळ सोनं अर्पण केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

प्रताप सरनाईक यांनी ३७ लाख ७५ हजार किमतीचे दागिने देवीच्या चरणी अर्पण केले आहे. देवीच दर्शन घेत सरनाईक यांनी दागिने अर्पण केले आहेत.

प्रताप सरनाईक यांनी ३७ लाख ७५ हजार किमतीचे दागिने देवीच्या चरणी अर्पण केले आहे. देवीच दर्शन घेत सरनाईक यांनी दागिने अर्पण केले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरणदेखील दिली आहे.

काय म्हणाले सरनाईक?

तुळजाभवानी आमची कुलदैवत आहेत. दोन्ही मुलांच्या लग्नावेळी मी नवस केला होता. आणि आज दोन्ही नातवंडाचे जावळ करायचं होतं. नवस फेडण्यासाठी मी इथे आलो होतो. आणि ज्यावेळी नवस केला होता त्यावेळी ५१ तोळ्याच्या पादुका २१ तोळ्याचा हार असं मी नवसामध्ये सांगितलं होतं. दोन्ही मुलांच व्यवस्थित होण्यासाठी मी नवस बोलो होतो. अस सरनाई यांनी यावेळी सांगितलं.

टॅग्स :pratap sarnaik