ED summons Shiv Sena MP Sanjay Raut to appear before them on 27th July in a money laundering case
ED summons Shiv Sena MP Sanjay Raut to appear before them on 27th July in a money laundering caseSakal

संजय राऊतांची मागणी ईडीने फेटळली; 'या' दिवशी हजर राहण्याचे निर्देश

मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावला आहे. गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले असून. त्यानुसार संजय राऊतांना 27 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (ED summons Shiv Sena MP Sanjay Raut to appear before them on 27th July in a money laundering case)

यापूर्वी राऊतांना 19 जुलैला ईडीने समन्स बजावत 20 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते, मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनामुळे संजय राऊत हे सध्या दिल्लीत आहेत. संजय राऊत यांनी ईडीकडे चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरिता 8 ऑगस्टपर्यंतची वेळ मागितली होती. यानंतर ईडीने त्यांना 27 जुलैपर्यंतची मुदती दिली आहे. याच प्रकरणात राऊतांची 1 जुलैला ईडीने जवळपास 10 तास कसून चौकशी केली होती.

ED summons Shiv Sena MP Sanjay Raut to appear before them on 27th July in a money laundering case
"काय नाना…तुम्ही पण झाडी डोंगार हाटेलात?" चित्रा वाघ यांच ट्विट

यापूर्वी दोन वेळा राऊतांची चौकशी झाली आहे. यापूर्वी याच प्रकरणात प्रवीण राऊत यांची यापूर्वी ईडीसमोर चौकशी झाली आहे. प्रवीण राऊत हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे.

ED summons Shiv Sena MP Sanjay Raut to appear before them on 27th July in a money laundering case
ओबीसी आरक्षणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये ईडीने या प्रकरणात संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीने केली होती. ईडीने यापूर्वी ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणामध्ये अटॅच केली आहे. मनी लॉण्ड्रींग कायदा २०२२ अंतर्गत गोरेगावमधील पत्रावाला चाळ पुर्निविकास प्रकल्पामध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ने केलेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com