

Private Universities Fees
ESakal
मुंबई : राज्यातील खासगी विद्यापीठे, तसेच स्वायत्त दर्जा घेतलेल्या सर्व शिक्षण संस्थांच्या मनमानी शुल्कवसुलीला लवकरच आळा बसणार आहे. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या सर्व संस्थांना राज्य शुल्क नियामक प्राधिकरणाच्या (एफआरए) अंतर्गत आणण्याचा निर्णय घेतला असून, संस्थांच्या मनमानी शुल्कांवर अंकुश आणला जाणार आहे, यासंदर्भात अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचे सूतोवाच केले.