दिल्लीच्या धर्तीवर मिळणार जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण

Education
Educationesakal

नामपूर (जि. नाशिक) : दिल्लीत आम आदमी पार्टीचे (AAP) संस्थापक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांनी सत्तेची सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर सरकारी शिक्षण व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे आपले लक्ष केंद्रित केले. खासगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांमध्ये त्यांनी अनेक सकारात्मक बदल घडवून आणल्याने जागतिक पातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली. राज्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना दिल्लीच्या धर्तीवर शिक्षण मिळावे, यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने कंबर कसली आहे. मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी नुकतीच अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे.

स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकावे हा प्रयत्न

राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळावे यासाठी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पुढाकार घेतला आहे. खासगी शाळांच्या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकून राहावेत, यासाठी दिल्ली निगमच्या शाळांच्या धर्तीवर आगामी काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे. यासंदर्भात श्री. सत्तार यांनी ग्रामविकास विभागाला प्रस्तावही पाठविला होता. त्यानुसार ग्रामविकास विभागाने यासाठी सात तज्ज्ञांच्या अभ्यास गटाची स्थापना केली असून दिल्लीच्या शैक्षणिक कार्य पद्धतीवर ते अभ्यास करणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, हा अभ्यासगट स्थापण्याचा मुख्य उद्देश आहे.

Education
17 व्या वर्षीच जगाचा निरोप; वडिलांचे स्वप्नही अपूर्णच

तज्ज्ञ मंडळी करणार शिकवण्याची कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास

आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही प्रगत तंत्रज्ञानासह जगातील सर्व अत्याधुनिक शिक्षण मिळणे गरजेचे आहे. दिल्ली निगमच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी काळानुरूप मोठ्या प्रमाणावर बदल व सुधारणा झाल्या आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, विद्यार्थी व शिक्षकांकरिता असणाऱ्या सुविधा, विद्यार्थ्यांचे आचार-विचार व शिस्त, शिक्षकांची शिकवण्याची कार्यपद्धती याचा सखोल अभ्यास तज्ज्ञ मंडळी करणार असून त्याचा अहवाल राज्य सरकारला ते सादर करतील.

Education
मानवी आरोग्यास घातक पॅराफीनची दुधात भेसळ; मोठा साठा जप्त

दिल्ली निगमच्या शाळांच्या शैक्षणिक पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी ग्रामविकास विभागाने सात तज्ज्ञांच्या अभ्यास गटाची स्थापना केली आहे. त्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, सेवानिवृत्त विशेष लेखा परिक्षक सहकारी संस्था आर.एस. शेख, फर्दापूर येथील सहशिक्षक काशिनाथ पाटील, अहमदनगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, औरंगाबाद जिल्ह्यातील वरूर (ता. सिल्लोड) येथील सहशिक्षक जगन सुरसे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कोण्हाटी येथील मुख्याध्यापक सुनील चिपाटे यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com