
सोलापूर : उन्हाळ्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सोमवारपासून (ता. १० ) सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० या वेळेत भरविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, ती एक तासाने कमी करून ११.३० पर्यंत भरविण्याची मागणी शिक्षक संघाने केली आहे.
बुधवारी (ता. ५) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाढत्या उन्हामुळे १ मार्चपासून जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याची मागणी सर्वच शिक्षक संघटनांनी केली होती. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानंतरच सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी घेतली होती.
बुधवारी झालेल्या बैठकीत १० मार्च ते २ मे या कालावधीत सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी शेख यांनी याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बैठकीतही त्यांना सूचना दिल्या. पूर्वी उन्हाळ्यात सकाळी ७.३० ते ११.३० पर्यंत शाळा भरवल्या जात होत्या. मात्र, यंदा ती वेळ १२.३० पर्यंत केली आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारपर्यंतची वेळ विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक असल्याचे शिक्षक संघाने म्हटले आहे.
शाळा सुटण्याची वेळ सकाळी साडेअकरापर्यंत करावी
दरवर्षी जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये १ मार्च पासून सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत शाळा भरविल्या जायच्या. मात्र, यंदा ती वेळ १२.३० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर ही वेळ सकाळी ११.३० पर्यंतच ठेवायला हवी होती. कारण जिल्ह्यातील उन्हाची तीव्रता लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक आहे.
- अनिरुद्ध पवार, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.