शिक्षणाधिकाऱ्यांचे व्हॉट्‌सॲप हॅक! ‘एपीके’ फाईल डाऊनलोड केली अन्‌ सर्वांनाच गेला लग्नाच्या आमंत्रणाचा मेसेज, शिक्षणाधिकाऱ्यांनी ठेवला स्टेट्‌स अन्‌...

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या व्हॉट्‌सॲपवरुन रविवारी (ता. २२) त्यांच्या संपर्कातील शेकडो लोकांना लग्नाच्या आमंत्रणाचा मेसेज आला. सर्वांना वाटले साहेबांच्या घरात कोणाचा तरी विवाह असेल. मात्र, सायबर गुन्हेगारांनी पाठविलेला मेसेज व त्याखालील ‘एपीके’ फाईल शिक्षणाधिकाऱ्यांनी डाऊनलोड केल्याने तो बनावट मेसेज त्यांच्या संपर्कातील सर्वांनाच गेला होता.
whats app hack

whats app hack

sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या व्हॉट्‌सॲपवरुन रविवारी (ता. २२) त्यांच्या संपर्कातील शेकडो लोकांना लग्नाच्या आमंत्रणाचा मेसेज आला. सर्वांना वाटले साहेबांच्या घरात कोणाचा तरी विवाह असेल. मात्र, सायबर गुन्हेगारांनी पाठविलेला मेसेज व त्याखालील ‘एपीके’ फाईल शिक्षणाधिकाऱ्यांनी डाऊनलोड केल्याने तो बनावट मेसेज त्यांच्या संपर्कातील सर्वांनाच गेला होता. ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी सर्वांना सावध केले.

शिक्षणाधिकारी श्री. जगताप यांच्या मोबाईलवर लग्नाच्या आमंत्रणाचा इंग्रजीत मेसेज आला होता. जिल्ह्यातील आपल्या ओळखीच्या कोणाचा तरी विवाह असेल म्हणून त्यांनी मेसेजखालील फाईल उघडली. त्यावेळी आपोआप ‘एपीके’ ॲप डाऊनलोड झाले आणि सायबर गुन्हेगारांनी त्यांचे व्हॉट्‌सॲप हॅक केले. त्यांच्याच मोबाईलवरून शेकडो लोकांना तो मेसेज फॉरवर्ड झाला. अनेकांनी शिक्षणाधिकाऱ्यांचा मेसेज आला आहे म्हणून ती फाईल उघडण्याचा प्रयत्न केला.

कोणीतरी शिक्षणाधिकाऱ्यांना त्या फाईलसंदर्भातील माहिती दिली आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी सोलापूर शहर सायबर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्यांना नेमके काय करायचे, याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी ती ॲप डिलीट केले आणि स्वत:च्या व्हॉट्‌सॲप स्टेट्‌सवर सर्वांना सावध करणारा मेसेज ठेवला. त्यामुळे अनेकांची फसवणूक टळली.

लग्नाच्या आमंत्रणाचा होता मेसेज

‘तुम्हाला आमच्या लग्नासाठी आमंत्रित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. समारंभाच्या संपूर्ण तपशिलासाठी, कृपया सोबत जोडलेले आमंत्रण डाऊनलोड करा. तुमच्या उपस्थितीने आणि आशीर्वादाने आमचा हा खास दिवस खरोखरच अविस्मरणीय होईल. तुमच्यासोबत हा सुंदर क्षण साजरा करण्यास आम्ही उत्सुक आहोत’. असा तो इंग्रजीतून मेसेज होता. त्याखाली ‘एपीके’ फा टाकलेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com