
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात २०१९-२० मध्ये जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९८ शाळा होत्या. सध्या दोन हजार ७७३ शाळा असून पाच वर्षांत पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या २५ शाळांना कुलूप लावावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर आता गुणवत्तेवर सर्वाधिक भर दिला जाणार आहे. १२ जूनपासून शिक्षकांच्या शाळापूर्व तयारीसंदर्भातील तालुकानिहाय बैठका होणार असून त्यावेळी शिक्षकांना चांगल्या वर्तणुकीचे व गुणवत्तेसंदर्भातील धडे दिले जाणार आहेत.