esakal | मोदींची लोकप्रियता घटतेय; एकनाथ खडसेंच्या टिकावर भाजपच्या रक्षा खडसे म्हणतात....

बोलून बातमी शोधा

eknath khadse raksha khadse
मोदींची लोकप्रियता घटतेय; एकनाथ खडसेंच्या टिकेवर भाजपच्या रक्षा खडसे म्हणतात....
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सलग दोन टर्म सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला यावेळी भाजपने जोरदार लढत दिली. भाजपच्या दिग्गज नेते यावेळी ममता बॅनर्जींविरोधात मैदानात उतरले होते. राज्यात 208 जागांसाठी 27 मार्च ते 29 एप्रिल या कालावधीत आठ टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले. ममता बॅनर्जी हॅट्रिक करणार की भाजप सत्ता स्थापन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून तृणमूल काँग्रेस सहज सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. निकालांवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घटत असल्याचं म्हटलं आहे. तर त्यांच्या सूनबाई असलेल्या भाजप खासदार रक्षा खडसे या काय म्हणाल्या पुढे वाचा...

एकनाथ खडसे म्हणाले..

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांची लोकप्रियता पूर्वीपेक्षा खूप वाढली आहे. भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत सारी शक्ती तन-मन-धन जे काही असेल-नसेल त्याचा वापर केला होता, तरी जनतेने नाकारले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता होती, ती आता कुठेतरी घसरल्याची दिसते. महाराष्ट्राचे भाजपचे संकट मोचक या निवडणुकीत अपयशी ठरले” असं एकनाथ खडसे म्हणाले.

हेही वाचा: झाशीच्या राणीप्रमाणे ममतादीदी लढल्या आणि विजयी झाल्या - छगन भुजबळ

रक्षा खडसे म्हणतात..

“पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एवढ्या जागा येणे ही फार मोठी गोष्ट आहे. कारण पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे राज्य होते. त्यांना चॅलेंज करुन 100 च्या जवळ आम्हाला जागा मिळवता आल्या. एका प्रकारे बंगालमध्ये भाजपाचे यशच म्हणावे लागेल” असं वक्तव्य रक्षा खडसे यांनी केलं

हेही वाचा: शरद पवारांनी ट्विट करत ममता बॅनर्जींना दिल्या शुभेच्छा! काय म्हणाले...