Eknath Shinde : दोन दिवसात CMसोबतच्या दुसऱ्या कार्यक्रमाला फडणवीसांची अनुपस्थिती; आता...

Devendra Fadnavis and Eknath Shinde
Devendra Fadnavis and Eknath ShindeEsakal
Updated on

मुंबई : केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे या मथळ्याची जाहिरात मंगळवारी राज्यभरात सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित आल्यानंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चेला उधाण आले होते.

Devendra Fadnavis and Eknath Shinde
ST bank Election : चुरस वाढली! सदावर्तेंच्या पॅनलला शिंदे गट, भाजपसह 6 पॅनलचे आव्हान

भाजपा - शिवसेना (शिंदे गट) यांचे युती सरकार असताना जाहिरातीवरून उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा फोटो गायब होता. त्यामुळे युतीत काही आलबेल सुरू नसल्याची टीका सुद्धा विरोधकांकडून करण्यात आली. तर दुसरीकडे प्रत्यक्षात या जाहिरातीमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज झाले आहे का ? त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला फडणवीस अनुपस्थित रहात आहेत का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Devendra Fadnavis and Eknath Shinde
Ashish Deshmukh: आशिष देशमुखांचा भाजप प्रवेशाचा दिवस ठरला; 'या' दिवशी होणार घरवापसी

येरवी राज्यातील प्रत्येक कार्यक्रमाला जोडीने उपस्थित राहणारे उपमुख्यमंत्री मंगळवार पासून मुख्यमंत्र्यांसोबत कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याचे दिसून आले. कोल्हापुरात मंगळवारी सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाला फडणवीस अनुपस्थित होते.

त्यानंतर बुधवारी एसटी महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुद्धा फडणवीस अनुपस्थित राहिले. त्यामुळे वर्तमान पत्रातील जाहिरातींमुळे युतीत मिठाचा खडा पडला की काय असे अनेक प्रश्न सर्वत्र उपस्थित केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Eknath Shinde Helicopter Incident
Eknath Shinde announcing development plans for Pandharpur and welcoming new leaders into Shiv Sena.
Tributes pour in for Asha Bhosle as leaders like Eknath Shinde mourn her passing.
Deputy CM Eknath Shinde reviewing water conservation efforts under the ‘Gal Mukt Dharan, Jal Yukt Shivar’ scheme.
Marathi News Esakal
www.esakal.com