दसरा मेळाव्यानंतर CM शिंदेंचा पोलिस आयुक्तांना फोन; काय आहे कारण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde

दसरा मेळाव्यानंतर CM शिंदेंचा थेट पोलिस आयुक्तांना फोन; काय आहे कारण?

अखेर शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला आव्हान देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा मेळावा घेतला होता. यावेळी जोरदार फटकेबाजी करण्यात आली. या भव्य मेळाव्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट पोलिस आयुक्तांना फोन केला आणि पोलिसांचे आभार मानले. (Eknath Shinde Called Police Commissioner Vivek Phansalkar After Dasara Melava )

दसरा मेळाव्याच्या दिवशी प्रचंड ताण असुनही मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणाऱ्या मुंबई पोलिसांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले आभार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिसांचे अभिनंदन केले. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून पोलीस दलाचे आभार मानले असल्याचे समजते.

हेही वाचा: Dasara Melava: कुणाच्या मेळाव्यात गर्दी जास्त? वाचा सविस्तर

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर इतिहासात पहिल्यांदाच काल शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा पार पडला.

हेही वाचा: PM मोदींचे शिंदे गटाला दसरा गिफ्ट; केंद्रात दिली मोठी जबाबदारी

शिवाजी पार्कवर एक लाख लोकांची गर्दी जमली असल्याचा दावा काहीजणांकडून करण्यात आला आहे तर बीकेसी मैदानावर दोन लाखांची गर्दी जमा झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण शिवाजी पार्कची क्षमता ५५ ते ६० हजार लोकांची असून पोलिसांच्या अंदाजानुसार काही लोकं मैदानात तर काहीजण मैदानाच्या बाहेर थांबलेले होते. त्यामुळे शिवाजी पार्कवर ६५ हजारांच्या आसपास लोकं असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.