भाजपमध्ये नाराजीनाट्य? फडणवीसांच्या बॅनरवर अमित शहांचा फोटोच नाही

उपमुख्यमंत्री म्हणून वर्णी लागल्याने फडणवीस नाराज असल्याच्या प्रतिक्रियाही आल्या होत्या.
bjp celebration of cm eknath shinde and devendra fadnavis in mumbai
bjp celebration of cm eknath shinde and devendra fadnavis in mumbai
Summary

उपमुख्यमंत्री म्हणून वर्णी लागल्याने फडणवीस नाराज असल्याच्या प्रतिक्रियाही आल्या होत्या.

मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडल्या आहेत. विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर राज्यात सत्तानाट्याला सुरुवात झाली. (maharashtra politics) दरम्यान, काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र आता मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. (bjp celebration of cm eknath shinde and devendra fadnavis in mumbai)

उपमुख्यमंत्री म्हणून वर्णी लागल्याने फडणवीस नाराज असल्याच्या प्रतिक्रियाही आल्या होत्या. हीच नाराजी उघड करणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईत भाजपकडून जल्लोष साजरा केला. जल्लोषासाठी ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरवर भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो लागलेला नाही, त्यामुळे फडणवीस अमित शाह यांच्यावर नाराज आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

bjp celebration of cm eknath shinde and devendra fadnavis in mumbai
सत्ताबदलाचे कोल्हापुरात पडसाद, महाडिक-पाटील संघर्षाला येणार धार?

शपथविधीआधी झालेल्या पत्रकार परिषदेत आपण सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर पंतप्रधान मोदींसह अमित शाह, जे.पी नड्डा यांनी ट्विट करत फडणवीसांना उपमुख्यमंत्रपदी विराजमान होण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मात्र या पदभारामुळे ते खूश नाहीत, अशी चर्चाही रंगू लागली आहे.

bjp celebration of cm eknath shinde and devendra fadnavis in mumbai
मी चुकीचं काम केलेलं नाही; ईडी कार्यालयाबाहेर संजय राऊतांचा आत्मविश्वास

काल, गुरूवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतानाही त्यांनी उपमुख्यमंत्रपद का घेतलं? वरिष्ठांच्या आदेशानंतरच फडणीसांना हा निर्णय घेणं भाग पडलं का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com