शिवसेनेचे आमदार नाराज? एकनाथ शिंदे म्हणातात...(व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 November 2019

शिवसेनेचे 17 आमदार सत्ता स्थापनेच्या पेचावरून नाराज असल्याच्या बातम्या आल्यानंतर शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांनी त्यावर स्पष्टीकर दिले आहे. शिंदे म्हणाले, 'शिवसेनेचे 17 आमदार नाराज असल्याची बातमी खोटी आहे. आमचा कोणताही आमदार नाराज नाही. सर्व आमदार पक्षासोबत आहेत,' 

मुंबई : शिवसेनेचे 17 आमदार सत्ता स्थापनेच्या पेचावरून नाराज असल्याच्या बातम्या आल्यानंतर शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांनी त्यावर स्पष्टीकर दिले आहे. शिंदे म्हणाले, 'शिवसेनेचे 17 आमदार नाराज असल्याची बातमी खोटी आहे. आमचा कोणताही आमदार नाराज नाही. सर्व आमदार पक्षासोबत आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला असताना शिवसेनेची कोंडी झाली आहे. आधी मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजपची साथ सोडलेली असताना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अजूनही सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. अशातच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे 17 आमदार नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या, यावर शिंदे यांनी खुलासा केला असून हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले आहे.

रिलायन्सने गाठला विक्रमी टप्पा; शेअर्सची उसळी 

भाजपसोबतची मैत्री तोडण्याच्या निर्णयावर शिवसेनेतील 17 आमदार नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. शिवसेनेनं हिंदुत्त्वाचा मुद्दाही सोडल्याने हे आमदार नाराज असल्याचे बोलले जात होते. नाराज आमदार हे पश्चिम महाराष्ट्रातील असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु, आता या सर्व मुद्यांचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्याकडून खंडन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Shinde clarifies about Shiv Senas 17 MLA upset