रिलायन्सने गाठला विक्रमी टप्पा; ठरली पहिलीच कंपनी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 November 2019

- रिलायन्सचे बाजारमूल्य 9.5 लाख कोटींवर 
- समभागाने उसळी घेतल्याने गाठला विक्रमी टप्पा 

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजने मुंबई शेअर बाजारात 9.5 लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्याचा टप्पा मंगळवारी गाठला. कंपनीच्या समभागाने आज दिवसभरात 3.52 टक्‍क्‍यांची उसळी घेत 1 हजार 514 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य आत्तापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोचले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील 9.5 लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली पहिली कंपनी ठरली आहे. दिवसअखेर रिलायन्सचा समभाग 1 हजार 509 रुपयांवर व्यवहार करीत होता. गेल्या महिन्यात 18 ऑक्‍टोबरला कंपनीने प्रथमच 9 लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्याचा टप्पा गाठला होता.

सोनियांसोबतची बैठक संपवून काँग्रेस नेते पवारांच्या घरी; काय होणार?

या वर्षात कंपनीचा समभाग 34 टक्‍क्‍यांनी वधारला आहे. याच काळात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये 12 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. चालू वर्षात कंपनीचे बाजारमूल्य 2.3 लाख कोटी रुपयांनी वधारले आहे.

रिलायन्स 'त्या' ऐतिहासिक टप्प्यापासून फक्त '30 रुपये' दूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance Industries becomes 1st Indian company to cross Rs 9.5 lakh crore