
CM Eknath Shinde News: शिंदे ॲक्शन मोडमध्ये! पक्षाचा ताबा मिळताच बोलवली शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
Shivsena News: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे.
या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यानंतर ठाकरे गट कोर्टात जाणार आहे.
दरम्यान अधिकृत रित्या शिवसेना एकनाथ शिंदे यांना मिळताच शिंदे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक उद्या बोलवली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित ही कार्यकारिणी पार पडणार आहे. यामध्ये पक्षाची पुढील वाटचाल, पुढील ध्येय धोरणे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
आज एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी विधीमंडळातील शिवसेना कार्यालयावर ताबा मिळवला आहे. ही कार्यकारिणीची बैठक उद्या संध्याकाळी ७ वाजता मुंबईतील ताज प्रेसेंडेंट येथे आयोजित करणायत आली आहे.
या बैठकील शिवसेनेचे आमदार,खासदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.